सौदी अरेबिया कच्च्या तेलाचे दर वाढवणार; सर्वाधिक फटका आशियाई देशांना बसणार

रशिया हा कच्च्या तेलाचा एक प्रमुख निर्यातदार देश आहे. मात्र अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवल्याने दुसरीकडे सौदी अरेबियातील कच्चा तेलाला अचानक मागणी वाढली आहे. वाढती मागणी पहाता सौदी अरेबिया पुढील महिन्यात आशियाई देशांसाठी आपल्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सौदी अरेबिया कच्च्या तेलाचे दर वाढवणार; सर्वाधिक फटका आशियाई देशांना बसणार
crude oil
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:40 AM

रशिया (Russia) आणि युक्रेमध्ये (Ukraine) युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहाणी झाली. दरम्यान रशियाने युद्धबंदीचे घोषणा करावी यासाठी अमेरिकेसह (US) युरोपातील सर्वच नाटोचे सदस्य असलेल्या देशांकडून रशियावर दबाव वाढवला जात आहे. अमेरिकेसह अनेक युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा एक प्रमुख निर्यातदार देश आहे. मात्र अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवल्याने दुसरीकडे सौदी अरेबियातील कच्चा तेलाला अचानक मागणी वाढली आहे. वाढती मागणी पहाता सौदी अरेबिया पुढील महिन्यात आशियाई देशांसाठी आपल्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दर महिन्याला पाच ते दहा डॉलरने होऊ शकते वाढ

याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून वृत्त देण्यात आले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार सैदी अरेबिया आपल्या कच्च्या तेलाच्या किमती पुढील महिन्यांपासून अशायी देशांसाठी वाढू शकतो. या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये दर महिन्याला पाच ते दहा डॉलर प्रति बॅरलची वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसे झाल्यास अशाई तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची भीती व्यक्ती केली जात आहे.

जागतिक बाजरपेठेवर युद्धाचा प्रभाव

रशिया आणि युक्रेन युद्धाचा आधीच मोठा फटका हा आशियासह भारतीय बाजारपेठेला बसला आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. इंधन दरवाढ गगनाला भीडली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 9 वेळा पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतल्यास महागाई आणखी वाढू शकते.

संबंधित बातम्या

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार

आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, …तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड

रशिया, युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेला फटका, पुढील वर्षी आर्थिक वृद्धी दर 7.6 टक्के राहण्याचा ‘इंडिया रेटिंग्स’चा अंदाज

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.