AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Flight Suspension: कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी, सेवा 31 ऑगस्टपर्यंत स्थगित

वंदे भारत मिशनअंतर्गत दोन देशांमधील विमानसेवा सुरू राहणार आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत हवाई दल अंतर्गत दोन देशांदरम्यान सध्या हवाई सेवा सुरू आहे.

International Flight Suspension: कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी, सेवा 31 ऑगस्टपर्यंत स्थगित
Indigo Airlines
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 3:49 PM
Share

नवी दिल्लीः International Flight Suspension: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा 31 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, वंदे भारत मिशनअंतर्गत दोन देशांमधील विमानसेवा सुरू राहणार आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत हवाई दल अंतर्गत दोन देशांदरम्यान सध्या हवाई सेवा सुरू आहे.

देशात शेड्युल व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा थांबविली

कोरोनामुळे 23 मार्च 2020 रोजी देशातील शेड्युल व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा थांबविली गेली. गेल्या 17 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सामान्य सेवा विस्कळीत झालीय. फ्लाईट निलंबनासंदर्भात डीजीसीएकडून नवीन आदेश जारी करण्यात आलाय. हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानांना लागू होणार नाही.

वंदे भारत मिशनअंतर्गत एअर बबल अंतर्गत आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू

कोरोना संकट सुरू झाल्यापासून शेड्युल आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद केली गेली. गेल्या एक वर्षापासून वंदे भारत मिशनअंतर्गत एअर बबल अंतर्गत आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा दुसर्‍या लाटेचा धोका वाढला, तेव्हा डझनभर देशांसह हवाई संपर्क पुन्हा एकदा बंद झाला. सुमारे 20 देशांनी भारतातून ये-जा करणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली होती. दुसरी लाट संपल्यानंतर स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, मालदीव, कतारसारख्या देशांनी पुन्हा हवाई संपर्कांना परवानगी दिली.

देशांतर्गत हवाई प्रवासाला जूनमध्ये सुधारणा

जूनमध्ये डीजीसीएने एक अहवाल शेअर केला होता, त्यानुसार जूनमध्ये सुमारे 31.13 लाख स्थानिक प्रवाशांनी हवाई मार्गाने प्रवास केला. ही संख्या मे महिन्यात प्रवास केलेल्या 21.15 लाखांपेक्षा 47 टक्के अधिक आहे. नागरी उड्डयन संचालनालयाच्या (DGCA) त्यानुसार एप्रिलमध्ये 57.25 लाख लोकांनी हवाई मार्गाने देशभर प्रवास केला.

दुसऱ्या लाटेचा परिणाम उघड

मे महिन्यात देशांतर्गत हवाई वाहतुकीत झालेली घट कोविड 19 साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे झाली होती, ज्याने देश आणि त्याच्या विमान क्षेत्राला गंभीरपणे प्रभावित केले. डीजीसीएने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, इंडिगोने जूनमध्ये 17.02 लाख प्रवासी वाहून नेले, जे देशांतर्गत बाजाराच्या 54.7 टक्के होते. एकूण स्पाईसजेटने 2.81 लाख प्रवाशांसह उड्डाण केले, जे एकूण देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या 9 टक्के होते.

संबंधित बातम्या

सरकार पेन्शन नियमात बदल करण्याच्या तयारीत, जाणून घ्या, फायदा कसा मिळणार?

टाटा समूह 5G च्या जगात क्रांती घडवण्याच्या तयारीत, एअरटेलसह मुकेश अंबानींना देणार टक्कर

International Flight Suspension: International flights banned in Corona crisis, service suspended until August 31

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.