AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Women’s Day : SBI ग्राहकांना मोठी संधी, महिलांसाठी मिळणार खास योजना

एसबीआयने एका वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की आम्ही महिला दिन साजरा करत असताना एसबीआयला महिला कर्जदारांना अतिरिक्त 5 जीपीएस सवलत जाहीर केल्याचा अभिमान आहे.

International Women's Day : SBI ग्राहकांना मोठी संधी, महिलांसाठी मिळणार खास योजना
स्टेट बँक
| Edited By: | Updated on: Mar 08, 2021 | 1:33 PM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women’s Day) स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) महिलांसाठी खास भेट जाहीर केली आहे. महिला घर खरेदीदाराला खूप करण्यासाठी ऑफर देऊन गृहकर्जावरील व्याज कमी करण्याचे बँकेने जाहीर केले आहे. एसबीआयने एका वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की आम्ही महिला दिन साजरा करत असताना एसबीआयला महिला कर्जदारांना अतिरिक्त 5 जीपीएस सवलत जाहीर केल्याचा अभिमान आहे. (international womens day sbi concession to women on home loan)

SBI होम लोनवर 6.70% व्याज

एसबीआय गृहकर्जावर 6.70% व्याज आकारत आहे. तसेच त्यावर कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती दरम्यान स्टेट बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत सर्व प्रकारच्या गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ (Waived Processing Fee) केले आहे. महिलांनी योनो या मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज केल्यास त्यांना 0.05 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येईल.

एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या गृह कर्जाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदराचे युद्ध सुरू केले.

एसबीआयने सुरु केले व्याजदराचे युद्ध

एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेने त्यांचे गृह कर्ज दर अनुक्रमे 6.7 आणि 6.65 टक्क्यांवर आणले आहेत. तथापि, या दराने केवळ अशा ग्राहकांना कर्ज मिळेल, ज्यांचे क्रेडिट स्कोर 800 किंवा त्याहून अधिक असेल. त्याशिवाय एचडीएफसी व्यतिरिक्त इतर बँकांचे नवीन दर फक्त 31 मार्च 2021 पर्यंत लागू आहेत. देशातील सर्वात मोठी एसबीआयने व्याजदराचे युद्ध सुरू केले. एसबीआयचे होम लोन 5 लाख कोटी रुपये आहे. एकूण 14.17 लाख कोटी रुपयांच्या कर्ज बाजारात एसबीआयचा 34 टक्के वाटा आहे. एसबीआयने आपले गृह कर्ज दर 0.10 टक्क्यांनी कमी करून 6.7 टक्के केला आहे. याव्यतिरिक्त एसबीआयने प्रोसेसिंग शुल्कही माफ केले आहे.

या 4 मोठ्या बँकांनी गृहकर्ज केले स्वस्त

– एसबीआय 31 मार्चपर्यंत 75 लाख रुपयांचे कर्ज 6.7 टक्के आणि त्याहून अधिक कर्ज 6.75 टक्के व्याज दराने देईल. तसेच त्यावर कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय महिलांनी योनो या मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज केल्यास त्यांना 0.05 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येईल.

– कोटक महिंद्रा बँकेनेही आपले गृहकर्ज दर 0.10 टक्क्यांवरून 6.65 टक्के केले आहे.

– कोटक महिंद्रा बँकेने कर्जाचे दर कमी केल्याच्या दोन दिवसानंतर एचडीएफसीनेही अमर्याद कालावधीसाठी आपल्या नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी गृह कर्जाचा दर 0.05 टक्क्यांनी कमी करून 6.75 टक्के केला. नंतर एचडीएफसीने गृह कर्जाचे दर 0.05 टक्क्यांनी कमी केले. याशिवाय प्रक्रिया शुल्क 3000 रुपये निश्चित केले.

– या बँकांनंतर आयसीआयसीआय बँकेनेही 5 मार्च रोजी 75 लाख रुपयांपर्यंत गृह कर्जावरील व्याज दर 6.7 टक्के केले. 75 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी व्याज 6.75 टक्के असेल. (international womens day sbi concession to women on home loan)

संबंधित बातम्या – 

डब्यात पैसे साठवणाऱ्या महिला आज म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये खेळतात, पुरुषांनाही ‘असं’ टाकलं मागे

International Women’s Day! महिलांनो अडचणीत असाल तर ‘या’ नंबरवर करा फोन, सरकारची मोठी योजना

Gold rate today : गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 12 हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा ताजे दर

Women’s Day ला घरातील मुलींना द्या खास गिफ्ट, भविष्याची चिंता होईल दूर

(international womens day sbi concession to women on home loan)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...