Women’s Day ला घरातील मुलींना द्या खास गिफ्ट, भविष्याची चिंता होईल दूर

तुम्हीही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या नावे खातं (Sukanya Samriddhi Account) उघडू शकता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:24 AM, 8 Mar 2021
1/7
प्रत्येक पालकांना आपल्या मुलांची काळजी असते. खासकरून लेकीची. यामुळेच मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) सध्या लोकप्रिय ठरत आहे.
2/7
सुकन्या समृध्दी खातेदारांनी 10 दिवसात पूर्ण करा हे काम
3/7
जास्तीत-जास्त किती रक्कम जमा कराल? - सुकन्या समृद्धि खातं हे तुम्ही तुमच्या दोन मुलींच्या नावे उघडू शकता.
4/7
मुलीने 10 वर्षे पूर्ण करण्याआधी हे खाते उघडलं जाऊ शकतं. फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडता येतं तर वर्षाला यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता.
5/7
या खात्यात 15 वर्षे पैसे जमा केले जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुकन्या समृद्धि योजना खात्यावर 7.6 टक्के व्याज दर मिळतो.
6/7
सुकन्या समृद्धि योजनेतून पैसे काढण्याचे नियम - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खातं बंद केलं जाऊ शकत नाही किंवा मुलीचं वय 18 वर्ष होण्यापूर्वी गुंतवणूक केलेले पैसे काढता येणार नाहीत.
7/7
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तुम्ही दोन अटींवर 50 टक्के पैसे काढू शकता. पहिली म्हणजे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि दुसरी म्हणजे तिच्या लग्नाची आर्थिक गरज.