Stock Marketमधील या ‘पंचरंगी’ शेअर्समध्ये गुंतवणूक करा! वर्षभरातच कमाईची चांगली संधी

Bombay Stock Exchange : ब्रोकरेज हाऊसने श्याम मेटालिक्स, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, स्टार हेल्थ, गोदरेज अॅग्रोव्हेटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. वर्षभरातच यात मोठी रक्कम कमवण्याची संधी असल्याचे म्हटले जात आहे.

Stock Marketमधील या 'पंचरंगी' शेअर्समध्ये गुंतवणूक करा! वर्षभरातच कमाईची चांगली संधी
होळीत नेमकं कुठे इन्व्हेस्ट करावं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 4:32 PM

सध्या सर्वत्र रंगपंचमीची (Holi) धामधूम सुरु आहे. जीवनात असलेले विविध रंग आपले आयुष्य अधिक आनंदी व समृध्द करीत असतात. हीच संकल्पना जीवनाच्या प्रत्येक पायरीवर खरी ठरत असते. एकाच गोष्टीची पुनरावृत्ती जीवनात निरसपणा आणत असते. याच प्रमाणे गुंतवणुकीच्या जगातही गुंतवणुकीसाठी आपल्या समोर विविध पर्याय उपलब्ध असणे आवश्‍यक असते. आज आपण या लेखात 5 विविध क्षेत्रातील कंपन्यांच्‍या शेअर्सची (stocks) माहिती घेणार ​​आहोत. आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने त्यामध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या रंगपंचमीच्या मुहूर्तावर तुम्हीही या शेअर्समध्ये गुंतवणूक (Investment) केल्यास, पुढच्या रंगपंचमीला हेच पंचरंगी शेअर्स तुमच्या जीवनातही आनंदाचे रंग भरतील.

श्याम मेटॅलिक्स

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने मेटल सेक्टरच्या श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जीमध्ये 400 चे लक्ष्य ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या 347 च्या पातळीवर आहे, म्हणजे येथून स्टॉक 15 टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. ब्रोकिंग फर्मच्या म्हणण्यानुसार, कंपनीने आपले कॅंपेक्स वाढवण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे तिच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल, ज्यामुळे कंपनीला आणखी फायदा होईल.

1. गोदरेज ऍग्रोव्हेट

मोतीलाल ओसवाल यांनी कृषी क्षेत्रातील कंपनी गोदरेज अॅग्रोव्हेटमध्ये 692 चे लक्ष्य ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा शेअर 477 वर आहे, म्हणजेच इथून शेअर 45 टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्यामुळे खाद्यतेलाची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे आणि कंपनीची कमाई लवकरच कोविड काळातील कमाईच्या वर पोहोचू शकते.

2. स्टार हेल्थ

मोतीलाल ओसवाल यांनी विमा क्षेत्रातील स्टार हेल्थमध्ये 750 च्या लक्ष्यासह गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या 638 च्या पातळीवर आहे. म्हणजेच, येथून स्टॉकमध्ये 17 टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. ब्रोकिंग फर्मच्या म्हणण्यानुसार, देशात आरोग्य विम्याबाबत जागरुकता वाढत आहे आणि मागणी वाढल्याने या क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या स्टार हेल्थला त्याचा पूर्ण फायदा होण्याची अपेक्षा आहे.

3. भारत इलेक्ट्रॉनिक्स

शेअरखान यांनी संरक्षण क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 254 चे लक्ष्य ठेवून गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या 209 वर आहे. म्हणजेच, येथून स्टॉक 21 टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकिंग फर्मच्या म्हणण्यानुसार, कंपनीला सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्वावलंबी उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.

4. एचडीएफसी बँक

शेअरखानने एचडीएफसी बँकेत 1973 चे लक्ष्य ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. एचडीएफसीचा स्टॉक सध्या 1480 च्या पातळीवर पोहोचला आहे. म्हणजेच, स्टॉकमध्ये 33 टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवरील निर्बंध हटवले आहेत. आगामी काळात बँक याचा पूर्ण लाभ मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल राहणार आहे. बँकेची स्वत:ची कामगिरी उत्तम राहिल. नवीन बदलामुळे कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची पूर्ण आशा आहे.

(टीप : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते. येथे दिलेला गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे, बाजारातील जोखमीमुळे कंपनीच्या कामगिरीच्या आधारावर गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य अभ्यास करावा. सर्व पातळ्यांवर विचार करुनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी.)

संबंधित बातम्या :

होळीनिमित्त Honda च्या गाड्यांवर 25000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, ऑफर 31 मार्चपर्यंत

IDBI बँकेच्या ‘या’ योजनेत मिळवा दुहेरी फायदा, चांगल्या परताव्यासोबतच टॅक्सची बचत

Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.