खेळाडूंवर कोट्यवधी खर्च करणाऱ्या IPL Teams ला कशातून होते बक्कळ कमाई? अशी वसूल करतात पै ना पै

IPL Teams | इंडियन प्रीमियर लीगचा कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणी आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज टीम (IPL Teams) त्यांची जादूई कामगिरी दाखवतील. पण टीम कमाई कुठून करतात. त्यांना पैसा कुठून येतो, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात..

खेळाडूंवर कोट्यवधी खर्च करणाऱ्या IPL Teams ला कशातून होते बक्कळ कमाई? अशी वसूल करतात पै ना पै
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 9:42 AM

नवी दिल्ली | 19 March 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 चे 17 वे सीझन 22 मार्च 2024 रोजीपासून सुरु होत आहे. क्रिकेट जगातातील हा महासंग्राम पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतूर झालेले आहेत. या चषकासाठी 10 संघ भिडतील. सामना जिंकण्याच्या ईर्षेने हे संघ एकमेकांना टशन देतील. प्रेक्षकांना या सामन्यात मनोरंजन, टशन, खेळाडूंची धमाकेदार कामगिरी, शाब्दिक चकमक असे जबरदस्त पॅकेज अनुभवायला मिळणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून अनेक टीम्सने त्यांच्या तंबूत जोरदार खेळाडू घेतले आहेत. पण त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या भरवशावर या टीम्सचे मालक सुद्धा मलाई खाणार आहेत.

कोट्यवधींचा डाव

इंडियन प्रीमियर लीगमध्ये टीम खरेदी आणि त्यानंतरच्या लिलाव प्रक्रियेत खेळाडू खरेदीसाठी बडे उद्योजक आणि व्यापारी, स्टार कोट्यवधी रुपये खर्च करतात. अर्थात क्रिकेट हा काही त्यांचा आवडता खेळ आहे, म्हणून ते कोट्यवधींचा चुरडा करत नाहीत. तर मोठ्या कमाईसाठी हा सर्व खर्च करण्यात येतो. आयपीएल टीम आणि त्यांचे मालक विविध माध्यमांतून या टूर्नामेंटमधून कमाई करतात. गुंतवणुकीची पै न पै वसूल करतात. जाणून घ्या कशी होते आयपीएल टीम, कशी करतात कमाई?

हे सुद्धा वाचा

आयपीएल टीम या पद्धतीने करतात बक्कळ कमाई (How IPL Teams Earn Money)

  1. मीडिया राईट्स – आयपीएल टीम्सची कमाई सर्वाधिक कमाई ही मीडिया राईट्सच्या माध्यमातून होते. आयपीएल 2024 मध्ये टीव्हीचे राईट्स स्टारकडे आहे. तर मोबाईलचे अधिकार हे मुकेश अंबानी यांच्या जिओकडे आहेत. आयपीएल अत्यंत लोकप्रिय आहे. करारानुसार, कंपन्या एका सामन्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंत देतात. यामधील काही वाटा हा BCCI ला देण्यात येतो. तर इतर पैसा हा टीममध्ये वाटण्यात येतो. जो संघ टूर्नामेंटमधील सर्वाधिक सामने जिंकते, तिला सर्वाधिक पैसा देण्यात येतो. तर जो संघ कमी सामने जिंकतो, त्याची कमाई सहाजिकच मर्यादीत असते.
  2. तिकिटांची विक्री – फ्रेंचाईजच्या कमाईचे एक प्रमुख स्त्रोत हा स्थानिक महसूल पण असतो. यामध्ये तिकीट विक्रीतून होणारी कमाई महत्वपूर्ण असते. एका मॅचमध्ये तिकिटांची विक्री सर्वात महत्वाची आहे. एका मॅचमध्ये तिकिटांच्या विक्रीतून जवळपास 80 वाटा या संघाना जातो. त्यामुळे अनेक फ्रेंचाईजचे त्यांचे स्वतःचे मैदानं असतं. त्यांना होम ग्राऊंड्स म्हणतात.
  3. जाहिराती आणि प्रमोशन्स – जाहिराती आणि प्रमोशन्सच्या माध्यमातून या संघाची घसघशीत कमाई होते. टीमची जर्शी, हेलमेट, अंपायरची जर्शी, विकेट, बाऊंड्री लाईन याठिकाणच्या जाहिराती आणि कंपनीच्या लोगोतून कोट्यवधींची उलाढाल होते. जाहिरातीतून या टीमला मोठी कमाई होते. फ्रेंचाईजीचे खेळाडून ब्रँडचे प्रमोशन करतात. त्याचा त्यांना फायदा होतो. ज्या टीमच्या किटवर जास्त जाहिराती असतात. ते अधिक कमाई करतात. तसेच सातत्याने विजयी होणारी टीम सुद्धा बक्कळ पैसा कमावते.
  4. अशी पण कमाई – आयपीएलच्या सर्व टीम त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठवतात. त्यांच्या टीमचे लोगो असलेले टीशर्ट, ग्लब्स, हेलमेट, झेंडे आणि इतर साहित्याची ऑनलाईन, खेळाच्या मैदानाजवळ विक्री करण्यात येते. चाहते त्याची खरेदी करतात. त्यातूनही या टीम आणि मालकांना कमाई होते.
  5. बक्षिसाची रक्कम – आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना, त्यांच्या मानांकनानुसार सर्वात शेवटच्या सामन्यानंतर बक्षिसाची रक्कम देण्यात येत. यामध्ये विजयी आणि सहविजयी(रनर-अप) टीमची सर्वाधिक कमाई होते. आयपीएल 2024 मध्ये विजयी टीमला 30 कोटी रुपये मिळतात. तर रनर-अप टीमला 10 कोटी रुपयांची कमाई होते. तर खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुरुप बक्षिस देण्यात येते.
Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.