IREDA Share | शेअर बाजारात इरडचा शेअर दाखवणार कमाल, देशात लवकरच सोलर युग

IREDA Share | इरडा शेअरने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी बाजारात सूचीबद्ध झाला होता. हा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी 50 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 32 रुपये होती. हा शेअर येत्या काही दिवसात मोठा पल्ला गाठण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही गुंतवणूक केली का?

IREDA Share | शेअर बाजारात इरडचा शेअर दाखवणार कमाल, देशात लवकरच सोलर युग
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 4:24 PM

नवी दिल्ली | 21 February 2024 : भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था लिमिटेडचा ( IREDA) शेअर सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी या सरकारी कंपनीचा आयपीओ आला होता. इरडाच्या आयपीओने गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. त्यांना अवघ्या काही दिवसातच 400 टक्क्यांचा परतावा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये विक्रीचे सत्र सुरु आहे. या शेअरमध्ये सातत्याने लोअर सर्किट लागत आहे. पण या शेअरमध्ये लवकरच उसळीचे संकेत मिळत आहे. कारण इरडाने नवीन कंपनी गठीत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

काय आहे योजना

  1. इरडाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक प्रदीप कुमार दास यांनी रुफटॉप सोलर, पीएम-कुसुम, इलेक्ट्रिक वाहन आणि बिझनेस टू कंझ्युमर कॅटेगिरीशी संबंधित योजना पूर्ण करण्यासाठी एक सहाय्यक कंपनी असावी यासाठी इरडात खलबंत सुरु आहे. भारत सरकारकडून मंजूरी मिळाल्यावर इरडा किरकोळ बाजारातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक सहायक कंपनी सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
  2. इलेक्ट्रिक वाहने, ग्रीन हायड्रोजन आणि ऑफशोर विंड सारख्या तंत्रज्ञानासहीत विविध अक्षय ऊर्जा प्रकल्पावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. कर्जदारांची चिंता मिटवण्यासाठी आणि जोरदार प्रदर्शनासाठी, एनपीए कमी करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कंपनीने कंबर कसली आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. कंपनीने देशभरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी अक्षय ऊर्जा प्रकल्पावर काम करण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम केली. कंपनीने त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेसोबत करार केला आहे. त्याआधारे विविध प्रकल्प पूर्ती करता येईल आणि पतमानांकन आणि इतर मानांकनात परिस्थिती सुधारण्यासाठी या वित्तीय सहायाची मदत होईल.

शेअरची किंमत

बुधवारी इरडाच्या शेअरच्या किंमतीत 5 टक्के घसरण दिसून आली. हा शेअर 166.35 रुपयांपर्यंत घसरला. तर 6 फेब्रुवारी रोजी हा शेअर 215 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला होता. इरडाच्या शेअरने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात प्रवेश केला होता. हा शेअर सूचीबद्ध झाला होता. हा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी 50 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 32 रुपये होती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.