AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफीसच्या नोकरीपेक्षा जास्त आहे डिलिव्हरी बॉयची कमाई? Zomato च्या सीईओंनी दिली माहिती

सुरक्षेसाठी आम्ही आमच्या पार्टनर्सवर 100 कोटीहून अधिक रुपये खर्च केले आहेत. यात 10 लाख रुपयांचा दुर्घटना विमा, 1 लाख रुपयांचा मेडीकल कव्हर आणि तसेच डिलिव्हरीच्या दरम्यान कमाईच्या नुकसानाची भरपाई (Loss-of-pay insurance) सारख्या सुविधांचा समावेश आहे.

ऑफीसच्या नोकरीपेक्षा जास्त आहे डिलिव्हरी बॉयची कमाई? Zomato च्या सीईओंनी दिली माहिती
Zomato आणि Blinkit चे डिलिव्हरी बॉय किती कमावतात ?
| Updated on: Jan 03, 2026 | 11:01 PM
Share

नुकताच गिग वर्कचा 31 डिसेंबरला संप झाला होता. त्यामुळे नववर्षांचे स्वागत करताना काही मेट्रो शहरात आनंदावर विरजण पडले. परंतू अवघ्या काही मिनिटात डिलिव्हरी देणाऱ्या आणि उन्हा पावसात गाडी दामटवत घराघरात वस्तू आणि खाद्यपदार्थ वेळेत पोहचवणाऱ्या या गिग वर्कर्सना किती मेहनताना मिळतो याचा विचार कधी केला आहे का ? केवळ दहा मिनिटात वस्तू पोहचवण्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या गिग वर्कर्सच्या कमाई संदर्भात Zomato आणि Blinkit यांचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी आकडा सांगितला आहे.

महीने की कमाई 25 हजार से ज्यादा है?

नेहमीच चर्चा सुरु असते की डिलिव्हरी पार्टनर्सची कमाई किती असते ही कमाई पहिल्या ऑफीसच्या नोकरीपेक्षा जास्त असते का असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात आहे. दीपेंद्र गोयल यांनी दिलेल्या आकडेवारवर नजर टाकली तर आश्चर्यकारक माहिती मिळते. साल 2025 मध्ये Zomato च्या डिलिव्हरी पार्टनर्सला प्रति तास सरासरी कमाई (EPH) 102 रुपये होती. जी गेल्या वर्षांच्या तुलनेत 11% जास्त होती. खास म्हणजे ही कमाई केवळ ऑर्डर डिलिव्हरी करण्याचा वेळेची नसून त्याऐवजी लॉग-इन राहणे आणि ऑर्डरची वाट पाहाण्याचा वेळ मिळून काढण्यात आली आहे.

गोयल यांनी कमाई संदर्भात आणखी माहिती देताना सांगितले की जर एखादा व्यक्ती महिन्यातील 26 दिवस काम करत असेल आणि रोज 10 तास लॉग इन रहात असेल तर त्याचे एकूण मासिक उत्पन्न (Gross Income) सुमारे 26,500 रुपये होऊ शकते. मात्र, यात पेट्रोल आणि बाईकच्या देखभालीच्या खर्चाचाही समावेश आहे. जर हे खर्च गृहीत धरले तर 20 टक्के कपात करावी लागेल. म्हणजे हातात येणारी खरी कमाई (Net Income) सुमारे 21,000 रुपये उरते. हा आकडा अनेक एण्ट्री लेव्हलच्या नोकरी किंवा त्यापेक्षा बरा म्हणावा असा आहे.

अनेक लोक पार्ट-टाईम करतात नोकरी

तुम्हाला वाटत असेल की डिलिव्हरीचे काम या तरुणांचा कमाईचा एकमेव मार्ग आहे. परंतू डेटानुसार तसे नाही. कंपनीने दावा केला आहे की बहुतांश पार्टनर्स यास फूल टाईम नोकरी म्हणून करत नाहीत. पार्ट टाईम किंवा त्यांच्या मर्जीनुरुप करतात. वर्षभरात सरासरी एका पार्टनरने केवळ 38 दिवस काम केले आहे.केवळ 2.3% लोक असे आहेत ज्यांनी वर्षभरात 250 दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे. म्हणजे हे काम लवचिकपणे चालते. येथे कोणतीही निश्चित शिफ्ट वा बॉस नसतो.

ग्राहकांद्वारा देण्यात येणाऱ्या टिपवर गोयल म्हणाले की अनेकांना वाटते टिपचे पैसे कंपनी जवळ ठेवते. परंतू टिपचे संपूर्ण पैसे हे डिलिव्हरी पार्टनरला दिले जाते. परंतू भारतीय ग्राहक टिप देण्यात थोडे कंजूस आहेत. ब्लिंकिटवर केवळ 2.5% आणि झोमॅटोवर 5% ऑर्डरवर टिप दिली जाते. सरासरी एका तासात टिपमधून होणारी कमाई केवळ 2.6 रुपये आहे.

10 मिनिटांच्या डिलिव्हरीचा दबाव ?

सर्वात मोठा वाद ‘क्विक कॉमर्स’ म्हणजे 10 मिनिटांच्या डिलिव्हरीवरुन सुरु आहे.यामुळे रायडर्सना वेगाने गाडी चालवण्याचा दबाव असतो. परंतू यावर स्पष्टीकरण देताना झोमॅटोच्या प्रमुखाने सांगितले की डिलिव्हरीच्या वेळेचा संबंध गाडीच्या वेगाशी नाही. तर स्टोअरचे लोकेशन आणि लॉजिस्टीक्सशी आहे. ब्लिंकीटवर डिलिव्हरीसाठी निश्चित केलेले सरासरी अंतर केवळ 2.03 किलोमीटर असते. ज्यास पूर्ण करण्यास 8 मिनिट्स लागतात. यावेळी सरासरी वेग 16 किलोमीटर प्रति तास असतो. जो शहरातील ट्रॅफीकच्या तुलनेत खुप सुरक्षित मानला जाऊ शकतो.

BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा.
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य.
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला.
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक.
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप.
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं.
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO.
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?.
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग.