AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio कडून 41 कोटी युजर्सला अलर्ट, मोफत मिळण्याच्या अमिषाने ‘ही’ चूक करु नका, नाहीतर मोठा भुर्दंड

41 कोटीपेक्षा जास्त ग्राहक असलेली आघाडीची टेलीकॉम कंपनी जिओने (Jio) महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

Jio कडून 41 कोटी युजर्सला अलर्ट, मोफत मिळण्याच्या अमिषाने 'ही' चूक करु नका, नाहीतर मोठा भुर्दंड
केवळ 75 रुपयांमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटा
| Updated on: Apr 27, 2021 | 11:21 PM
Share

नवी दिल्ली : सध्याचं युग डिजीटल युग आहे. फक्त शहरांमध्येच नाही तर अगदी ग्रामीण भागातही आता चहा पिण्यापासून शॉपिंग करण्यापर्यंतचे व्यवहार ऑनलाईन होत आहेत. डिजीटल पेमेंटमध्ये यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग अॅप असे अनेक पर्याय आहेत. मात्र, हे व्यवहार करताना फसवणूक होऊ नये म्हणून काही खबरदारीही घेणं महत्त्वाचं आहे. याचाच विचार करुन 41 कोटीपेक्षा जास्त ग्राहक असलेली आघाडीची टेलीकॉम कंपनी जिओने (Jio) महत्त्वाचं पाऊल उचललं आहे (Jio alert users about fraud messages of free Mobile data).

डिजीटल युगात ऑनलाईन व्यवहार होत असताना यात मोठी आर्थिक फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही वाढ झालीय. सायबर गुन्हेगार अनेक प्रकारे नागरिकांची फसवणूक करत आहेत. यातील फसवणुकीचा एक प्रकार म्हणजे सायबर गुन्हेगार आधी मोफत मोबाईल इंटरनेट डाटाची ऑफर (Free Mobile Data Offer) देण्याचा फसवा मेसेज पाठवत आहेत किंवा कॉल करत आहेत. यातून ते संबंधित व्यक्तीची व्यक्तिगत माहिती मिळवून त्याचा उपयोग आर्थिक फसवणुकीसाठी करत आहेत. त्यामुळेच जिओने आपल्या ग्राहकांना अशा फसव्या ऑफरपासून सावध राहण्याबाबत अलर्ट जारी केलाय.

जिओकडून कोणता अलर्ट जारी?

Jio ने मोबाईल युजर्सला अलर्ट मेसेज पाठवलाय. त्यात म्हटलं आहे, “फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेल्या कोणत्याही मेसेजपासून सावध रहा. या मेसेजेसमध्ये युजर्सला व्यक्तिगत माहिती/ केवायसी (KYC) डिटेल्स अपडेट करायला सांगितलं जात आहे. अशा मेसेजपासून सावध राहिलं पाहिजे. या शिवाय काही मेसेजमध्ये मोफत मोबाईल डेटा देण्याचं आमिष दाखवण्यात येतं. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरुन कॉल करुन व्यक्तिगत माहिती विचारल्यास ही माहिती देऊ नका. सुरक्षित रहा.”

तज्ज्ञांच्या मते, “आमिष दाखवून व्यक्तिगत माहिती मिळवणारे तुमची कष्टाची कमाई चोरी शकतात. त्यामुळे कुणालाही आपली व्यक्तिगत माहिती देऊ नका.”

गुन्हेगार कोणते कारण सांगत व्यक्तिगत माहिती मिळवतात?

  • तुमच्या बँकेकडून बोलतो आहे. तुमच्यासाठी ही खास ऑफर आहे.
  • एटीएम वैधता संपली आहे.
  • केवायसी डिटेल्स सांगा अन्यथा बँक खाते बंद होईल.
  • तुम्हाला कमी व्याजात कर्ज मिळेल.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय कराल?

  • वेळोवेळी बँक खात्याचा पासवर्ड बदलत राहा.
  • अनोळखी व्यक्तिला फोन, ईमेल किंवा एसएमएसद्वारे इंटरनेट बँकिंगची माहिती देऊ नका.
  • टेक्‍स्‍ट मेसेज किंवा व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका.
  • बँके संबंधीच्या कोणत्याही शंका असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी.
  • फसवणूक झाल्यास तातडीने आपल्या बँकेला आणि पोलिसांना याची माहिती देत तक्रार नोंदणी करा.

हेही वाचा :

Banking Fraud: 10 दिवसात बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे मिळणार, वाचा RBI च्या सोप्या टीप्स

10 वी नापास भामट्याचा पोलिसाला दीड कोटीचा चुना, वकील आणि इतर पोलिसांचीही फसवणूक

सावधान, तुम्हालाही RBI गव्हर्नरच्या नावाने मेल आलाय का? ‘असं’ आहे फसवणुकीचं संपूर्ण प्रकरण

व्हिडीओ पाहा :

Jio alert users about fruad messages of free Mobile data

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.