AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करा; हमखास पैसे होतील दुप्पट

या योजनेत 1000 रुपयांची किमान गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर 100 च्या पटीत कितीही रकमेची गुंतवणूक तुम्ही करु शकता. | Kisan vikas patra

'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा; हमखास पैसे होतील दुप्पट
आरडी खात्यावर 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकता
| Updated on: Dec 28, 2020 | 8:46 AM
Share

मुंबई: किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही पोस्ट ऑफिसची लघु मुदतीची गुंतवणूक योजना आहे. यामध्ये पैसे गुंतवल्यास 10 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतात. सध्या मुदत ठेव (Fixed Deposits) आणि बचत खात्याचा व्याजदर घटला असताना Kisan Vikas Patra हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जात आहे. यामध्ये वर्षाला 6.9 टक्के चक्रवाढ व्याजाने तुमचे पैसे वाढत जातात. (Investment in Kisan Vikas Patra)

या हिशेबाने 124 महिने अर्थात दहा वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतात. या योजनेत 1000 रुपयांची किमान गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर 100 च्या पटीत कितीही रकमेची गुंतवणूक तुम्ही करु शकता. देशातील कोणत्याही भागातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येते.

गुंतवणुकीसाठीचे नियम काय?

अविवाहित सज्ञान किंवा जास्तीत जास्त तीन लोक या योजनेत एकत्रितपणे गुंतवणूक करु शकतात. अल्पवयीन मुलांसाठीही ही योजना उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी संबंधित मुलाचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीकडून देखरेख केली जाते. हिंदू अविभाजित कुटुंब आणि NRI ट्रस्ट वगळता सर्वांसाठी ही योजना लागू आहे.

वन टाइम इन्वेस्टमेंट

Kisan Vikas Patra ही एकरकमी गुंतवणूक योजना (One time investment) आहे. ज्यांना कोणतीही जोखीम न पत्करता गुंतवणूक करायची आहे, अशा लोकांसाठी ही योजना हमखास पैसे दुप्पट करण्याचा मार्ग आहे. पोस्ट ऑफिसशिवाय सार्वजनिक बँकांच्या माध्यमातूनही तुम्ही या योजनेसाठी गुंतवणूक करु शकता.

अडीच वर्षांचा लॉकिंग पिरीयड

या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला अडीच वर्षांसाठी कोणत्याही (Kisan Vikas Patra lock-in period) परिस्थितीत पैसे काढता येणार नाहीत. त्यानंतर आपातकालीन परिस्थितीत तुम्ही हवे असल्यास पैसे काढू शकता. याशिवाय, या गुंतवणुकीच्याआधारे तुम्ही कर्जही घेऊ शकता. किसान विकास पत्र एका गुंतवणुकदाराकडून दुसऱ्याकडे अथवा एका पोस्ट ऑफिसकडून दुसऱ्याकडे सहजपणे हस्तांतरित करता येते.

योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

तुम्हाला Kisan Vikas Patra योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयाची, पत्त्याची आणि छायचित्र ओळखपत्राची पडताळणी केली जाते. त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यासारखी कागदपत्रे लागतात. या योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही. परंतु, 50 हजारापेक्षा अधिकच्या रक्कमेवर गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक आहे.

किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर कर आकारला जातो का?

या योजनेत गुंतवणूक केल्यास करातून सुटका मिळत नाही. ही योजना 80सी सेक्शनमध्ये येत नाही. Kisan Vikas Patra मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. तुमच्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात हे हे उत्पन्न समाविष्ट केले जाते. त्यानंतर टॅक्स स्लॅबनुसार कर आकारणी होते. तसेच व्याजाच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नावर 10 टक्के टीडीएस आकारला जातो.

संबंधित बातम्या:

SBIची खातेदारांना मोठी भेट, ITR फाईल करा एकदम मोफत

टीव्ही आणि फ्रीज आताच खरेदी करा, नव्या वर्षात ‘इतक्या’ किंमती वाढणार

घर भाड्याने दिलं आहे तर आधी वाचा Income Tax चे नियम, नाहीतर होईल नुकसान

(Investment in Kisan Vikas Patra)

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.