AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलग 5 वर्षे नोकरीनंतर पीएफ रक्कम काढणं करमुक्त? वाचा सविस्तर…

पीएफ धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही सलग 5 वर्ष नोकरीनंतर कोणत्याही कराविना तुमच्या खात्यातील पीएफ रक्कम काढू शकता.

सलग 5 वर्षे नोकरीनंतर पीएफ रक्कम काढणं करमुक्त? वाचा सविस्तर...
पीएफ
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 8:46 PM
Share

मुंबई : पीएफ धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही सलग 5 वर्ष नोकरीनंतर कोणत्याही कराविना तुमच्या खात्यातील पीएफ रक्कम काढू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या नोकरीच्या काळात सुरुवातीच्या 5 वर्षात नियमित पीएफ खातेधारक असायला हवे. तसेच या काळात तुमच्या पीएफ खात्यात नियमितपणे रक्कम जमा व्हायला हवी (Know all about tax free PF withdrawal after 5 years continuous service).

एका पेक्षा अधिक ठिकाणी नोकरी केली असेल तर?

जर तुम्ही एका पेक्षा अधिक ठिकाणी नोकरी केली असेल तर पहिल्या कंपनीच्या काळात जमा झालेली पीएफ रक्कम आताच्या कंपनीच्या पीएफ खात्यात वर्ग केली जाते. तुमची सेवा सलगपणे 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी व्हायला हवी.

सलग 8 वर्षे काम केल्यानंतर काही काळा पीएफ जमा झाला नाही तर?

एका उदाहरणावरुन समजावून घेऊ. समजा तुम्ही एका कंपनीत सलग 8 वर्ष काम केलं. इथं तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त वर्ष सलगपणे काम केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही नोकरीचं ठिकाण बदललं. पीएफ बॅलन्स पहिल्या नोकरीच्या ठिकाणच्या पासबूकवरुन सध्याच्या ठिकाणच्या पीएफ खात्याच्या पासबूकवर वर्ग केले. तुमची सेवा सलगपणे 5 वर्षापेक्षा जास्त होत असेल. जुनी कंपनी आणि नवीन कंपनी धरुन तर तुम्ही तुमच्या खात्यात जमा होणारी पीएफची रक्कम कोणत्याही कराशिवाय काढू शकता.

तुम्ही कोणत्याही ठिकाणी काम करत नसताना तुमच्या पीएफ खात्यात रक्कम जमा झाल्यास किंवा तुम्ही तिसऱ्या कंपनीतून बाहेर पडल्यानंतर पीएफ खात्यात रक्कम केली. किंवा खात्यातून रक्कम काढण्याच्या तारखेपर्यंतच्या रकमेवर कर लागू शकतो.

हेही वाचा :

ऑफिस वेळेशिवाय 30 मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागणार, काय आहेत नियम?

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; सरकारच्या निर्णयामुळे PF खातेधारकांना होणार मोठा फायदा

नोकरदारांची चिंता मिटली; EPFO ने आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली

व्हिडीओ पाहा :

Know all about tax free PF withdrawal after 5 years continuous service

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.