LIC IPO : देशातील सर्वात मोठ्या आयपीओत गुंतवणुकीची शेवटची संधी, जाणून घ्या कसा कराल अर्ज

एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची आजची शेवटची संधी आहे. या आयपीओत बोली लावण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एलआयसीचा आयपीओ आज म्हणजेच सोमवारी बंद होत आहे. गुंतवणूकदार आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यात गुंतवणूक करू शकतात. आतापर्यंत एलआयसीचा आयपीओ अडीचपेक्षा जास्त वेळा सब्सक्राइब झाला आहे.

LIC IPO : देशातील सर्वात मोठ्या आयपीओत गुंतवणुकीची शेवटची संधी, जाणून घ्या कसा कराल अर्ज
Image Credit source: tv 9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 09, 2022 | 5:09 PM

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओमध्ये (IPO) 9 मेपर्यंत म्हणजे आता अवघ्या काही तासांमध्ये विमाधारक (Policy Holder) आणि किरकोळ गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध आहे.किमान 15 शेअर्सच्या खंडात प्रत्येक शेअरसाठी 902-949 रुपयांचे गुतंवणूक उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. या आयपीओमध्ये दोन सवलती देण्यात आल्या आहेत. एक पॉलिसीधारकांसाठी आणि दुसरी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी. पॉलिसीधारकांना 60 रुपये तर किरकोळ गुंतवणूकदाराला 45 रुपये सवलत मिळणार आहे. पण एकाच वेळी दोन सवलतींवर दावा सांगता येणार नाही. एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची आजची शेवटची संधी आहे. या आयपीओत बोली लावण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. गुंतवणूकदार आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यात गुंतवणूक करू शकतात. आतापर्यंत एलआयसीचा आयपीओ अडीचपेक्षा जास्त वेळा सब्सक्राइब झाला आहे.

डीमॅट खाते असणे आवश्यक

आज दुपारी 2 वाजेपर्यंत या महाआयपीओमध्ये अडीचपेक्षा जास्त वेळा सब्सक्राइब करण्यात आले आहे. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या 16 कोटी 20 लाख 78 हजार 067 समभागांच्या तुलनेत 40 कोटीहून अधिक समभागांसाठी यापूर्वीच निविदा प्राप्त झाल्या आहेत. पॉलिसीधारकांसाठी राखीव प्रवर्गात सर्वाधिक बोली प्राप्त झाल्या आहेत. या श्रेणीत, 5.71 वेळा सब्सक्राइब झाले आहे. एलआयसीच्या कर्मचा-यांसाठी राखीव हिस्सा 4.19 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 1.84 पट आहे. सेबीच्या नियमानुसार कोणत्याही कंपनीचे इक्विटी शेअर्स केवळ डिमॅट स्वरूपात येतात. त्यामुळे पॉलिसीधारक असोत वा सर्वसामान्य गुंतवणूकदार, त्यांच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या डिमॅट खाते किंवा त्याच्या अॅपच्या माध्यमातून आयपीओमध्ये अर्ज करू शकता. येथे तुम्हाला 3 श्रेणींचा पर्याय समोर येईल. तुम्हाला ज्या प्रवर्गासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला किती खंड (Lot ) हवे आहेत ते भरा. यानंतर लॉटच्या किंमतीचे पैसे तुमच्या खात्यातून वळते होतील अथवा राखीव राहतील. अशा परिस्थितीत 12 मे रोजी तुम्हाला शेअर वाटप झाले तेव्हा तुमच्या खात्यातून पैसे वजा होतील आणि 16 मे रोजी तुमच्या डिमॅट खात्यात शेअर्स येतील. यानंतर 17 मे रोजी एलआयसीचा शेअर बाजारात सुचीबद्ध होईल. जर तुमच्या बोलीनुसार शेअर्स प्राप्त झाले नाही तर तुमची राखीव रक्कम तुमच्या खात्यात वळती करण्यात येईल. ही प्रक्रिया 13 मे पासून सुरु होईल. ही रक्कम एक ते दोन दिवसांत तुमच्या खात्यात जमा होईल. तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एलआयसी ऑफिस किंवा तुमच्या डिमॅट अकाउंट कंपनीच्या ऑफिसशी संपर्क साधावा लागेल. एलआयसीच्या आयपीओची किंमत 904-949 रुपये आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी 949 रुपयांच्या उच्च पातळीवरील बोली लावावी. त्यामुळे 15 खंडातील शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होऊ शकतील.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें