अमेरिकेतील वॉल्टन कुटुंबाप्रमाणे मुकेश अंबानी मुलांमध्ये संपत्ती वाटणार; नेमकं मॉडेल काय?

मुकेश अंबानी यांनी अद्याप RIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद सोडण्याबाबत जाहीरपणे काहीही बोललेले नाही हे गोष्टही लक्षात घेतली पाहिजे, पण ते आता आपल्या मुलांना कंपनीच्या कामात पुढे आणत आहेत. या वर्षी जूनमध्ये शेअरधारकांना संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले होते की, आकाश, ईशा आणि अनंत रिलायन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

अमेरिकेतील वॉल्टन कुटुंबाप्रमाणे मुकेश अंबानी मुलांमध्ये संपत्ती वाटणार; नेमकं मॉडेल काय?
Mukesh Ambani family

नवी दिल्लीः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​(RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी आपला हा अवाढव्य पसरलेल्या व्यवसायाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत देण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत. ते जगभरातील अब्जाधीश कुटुंबांमध्ये वारसा वाटप किंवा वारस निवड पद्धतींचा अभ्यास करीत आहेत. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर भाऊ अनिल अंबानी यांच्यासोबत भागभांडवल वाटपाच्या वादामुळे ते आधीच सावध झालेत आणि आता या कामासाठी योग्य मॉडेल शोधत आहे, जेणेकरून मुलांमध्ये भविष्यातील मालमत्तेवरून वाद होऊ नयेत.

मुकेश अंबानी व्यवसायाचं साम्राज्य पुढील पिढीकडे सोपवण्याच्या तयारीत

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी $208 बिलियन व्यवसायाचं साम्राज्य पुढील पिढीकडे सोपवण्याच्या तयारीत आहेत. सर्व मॉडेल्स पाहिल्यानंतर त्यांना वॉलमार्ट इंकचे वॉल्टन कुटुंबाचे संपत्ती शेअरिंग मॉडेल सर्वात जास्त आवडले. आगामी काळात मुकेश अंबानीही कंपनीची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवू शकतात, असे मानले जात आहे.

मुकेश अंबानी कुटुंबाचा हिस्सा ट्रस्टकडे हस्तांतरित करू शकतात

रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी आपल्या कुटुंबाचा शेअर ट्रस्टला ट्रान्सफर करू शकतात. हा ट्रस्ट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हाताळेल. मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि तिन्ही मुलांचा यात हिस्सा असेल आणि तेही बोर्डात सामील असतील. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांचे काही जुने विश्वासू सल्लागार म्हणून ट्रस्टशी जोडले जातील.

ते आता आपल्या मुलांना कंपनीच्या कामात पुढे आणतायत

मुकेश अंबानी यांनी अद्याप RIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद सोडण्याबाबत जाहीरपणे काहीही बोललेले नाही हे गोष्टही लक्षात घेतली पाहिजे, पण ते आता आपल्या मुलांना कंपनीच्या कामात पुढे आणत आहेत. या वर्षी जूनमध्ये शेअरधारकांना संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले होते की, आकाश, ईशा आणि अनंत रिलायन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

वॉलमार्टचे वॉल्टन फॅमिली मॉडेल नेमके काय?

मुकेश अंबानी यांना वॉल्टन कुटुंबाचे संपत्ती शेअरिंग मॉडेल सर्वात जास्त आवडले आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय. सॅम वॉल्टन यांनी 1962 मध्ये वॉलमार्टची स्थापना केली आणि 1992 मध्ये त्यांचे निधन झाले. सॅम यांच्या मृत्यूनंतर बिझनेस ट्रान्स्फर ज्या पद्धतीने मॅनेज केले गेले, त्यामुळे अंबानी खूप प्रभावित झालेत. तसेच 1988 मध्ये सॅम वॉल्टन यांच्या मृत्यूच्या 4 वर्षांपूर्वी वॉल्टन कुटुंबाने कंपनीचे दैनंदिन काम व्यवस्थापकांकडे सोपवले आणि मंडळाच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवले. बोर्डात सॅमचा मोठा मुलगा रॉब वॉल्टन आणि त्याचा पुतण्या यांचा समावेश आहे. वॉलमार्टची स्थापना करणारे सॅम वॉल्टन हे खूप दूरदर्शी मानले जातात. त्यांच्या मृत्यूच्या सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांनी 1953 मध्ये उत्तराधिकार योजनेवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यवसायातील 80 टक्के हिस्सा त्यांच्या 4 मुलांमध्ये विभागला होता. त्यामुळे फाळणी आणि ताटातुटीचे कामही झाले नाही आणि कंपनीवर कुटुंबाचा ताबा राहिला. वॉल्टन कुटुंबाकडे सध्या वॉलमार्टमध्ये 47 टक्के हिस्सा आहे.

संबंधित बातम्या

Gold Price Today: सोन्याचे नवीन दर जारी, त्वरित तपासा 10 ग्रॅमची किंमत

बनावट वेबसाईटपासून सावधान, तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Published On - 1:05 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI