AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदारांनो 15 दिवसांत ‘हे’ काम आटपा, अन्यथा पीएफचे पैसे अडकण्याची शक्यता

EPFO Aadhar | यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 जूनपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते.

नोकरदारांनो 15 दिवसांत 'हे' काम आटपा, अन्यथा पीएफचे पैसे अडकण्याची शक्यता
ईपीएफओ
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 9:44 AM
Share

मुंबई: नोकरदार व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) खात्याबाबत येत्या काही दिवसांमध्ये बदलांची शक्यता आहे. कारण EPFO खात्याचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत संपण्यासाठी केवळ 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 जूनपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, जून महिन्यात UAN नंबर आणि आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

तर दुसरीकडे केंद्र सरकारने पॅनकार्ड (Pancard) आणि आधार लिंक (Aadhar Card) करण्यासाठीही 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती. ही मुदतही लवकरच संपुष्टात येईल. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅन आधारशी जोडलं नाही तर पॅन कार्ड धारकांना आयकर कायद्यानुसार दंड भरावा लागेल. जर दंड टाळायचा असेल तर अंतिम मुदत संपण्यापूर्वी पॅनला आधारशी लिंक करणे गरजेचे आहे.

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?

स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा. स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.

संंबंधित बातम्या:

नोकरदार, मजुरांसाठी मोठी बातमी, सामाजिक सुरक्षा संहिता लवकरच लागू होणार, श्रमिकांना काय फायदा?

आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.