lPG Cylinder: 1 महिन्यात किती सिलेंडर बुक करता येतात? लग्न सोहळ्यासाठी किती मिळतात सिलेंडर? माहिती आहेत का हे नियम?

LPG Cylinder Booking Rules: सरकारने आणि तेल कंपन्यांनी काही नियम तयार केले आहे. त्यामुळे घरपोच सिलेंडर मिळणे सोपे होणार आहे. सध्या बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने एजन्सीबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. लग्न सोहळ्यासाठी किती मिळतात सिलेंडर? माहिती आहेत का हे नियम?

lPG Cylinder: 1 महिन्यात किती सिलेंडर बुक करता येतात? लग्न सोहळ्यासाठी किती मिळतात सिलेंडर? माहिती आहेत का हे नियम?
एलपीजी सिलेंडर बुकिंग
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 29, 2026 | 3:20 PM

LPG Cylinder Booking Rules: देशात एलपीजी सिलेंडरविषयी पॅनिक स्थिती आहे. अजूनही अनेक गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा आहेत. ग्राहकांना वेळेत आणि घरपोच सिलेंडर मिळावा यासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत. तर आखातातून नैसर्गिक गॅस घेऊन काही जहाजांनी भारताच्या समुद्रकिनारी नांगर टाकला आहे. येत्या काही दिवसात उरलेली गर्दीही दिसणार नाही. पुरवठा लवकरच सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशाकडे पुढील दोन महिने पुरेल इतका इंघन आणि गॅस साठा असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. तर इतर 40 हून अधिक देशांकडून लवकरच पुरवठा होणार असल्याचा सरकारचे म्हणणे आहे. पण गॅस बुकिंगचे हे नियम तुम्हाला माहिती आहे का?

एका महिन्यात किती करता येतात गॅस बुक?

भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड, BPCL च्या नवीन नियमानुसार, एका ग्राहकाला एका महिन्यात जास्तीत जास्त दोन घरगुती गॅस सिलेंडर बुक करता येतात. यापेक्षा अधिक सिलेंडर बुक केल्यावर सिस्टिममधूनच बुकिंग होत नाही. त्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू आहे. तर एका आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान 12 सब्सिडी सिलेंडर बुक करता येतात. तर गरज असेल तर 3 विना अनुदानित सिलेंडर मिळतात. वर्षाला एकूण 15 सिलेंडर बुक करता येतात.

BPCL ची नवीन प्रक्रिया

भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडने (BPCL) अतिरिक्त सिलेंडरच्या बुकिंसासाठी नवीन व्यवस्था सुरू केली आहे. जर तुम्ही वर्षाला 12 सिलेंडरचा कोटा पूर्ण केला असेल आणि त्यानंतरही सिलेंडर हवा असेल. तर त्याविषयीच्या नियमांचे पालन करावे लागते. त्यासाठी तुम्हाला ‘Hello BPCL’ ॲपचा वापर करावा लागेल. या ॲपवर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील.

तुमच्या घरी किती सदस्य आहेत.

तुमच्या घरी लग्न अथवा इतर कार्यक्रम आहे का

तुमच्याकडे कार्यक्रमासाठी येणार्‍या पाहुण्यांची संख्या किती आहे

या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला अतिरिक्त सिलेंडर द्यायचे की नाही याची खात्री करुन पुढील निर्णय घेण्यात येतो.

Follow Us