AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gas Cylinder : आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या

LPG Cylinder : महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली. गॅस सिलेंडरच्या किंमतीत जवळपास 34 रुपयांची कपात झाली आहे. गेल्या पाच महिन्यात सलग किंमती घसरल्याने ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे.

Gas Cylinder : आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात
| Updated on: Aug 01, 2025 | 8:41 AM
Share

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींविषयी मोठी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली. सरासरी 34 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सलग पाच महिन्यात 170 रुपयांची घसरण आली. जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने किंमती घसरल्या आहेत.

गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे

भारतभर गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण दिसून आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे आहेत. एप्रिल महिन्यात यापूर्वी घरगुती गॅसच्या किंमतीत बदल दिसून आला होता. एप्रिल महिन्यात मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची दरवाढ झाली होती. तेव्हापासून त्यात कपात झालेली नाही. तर दुसरीकडे सलग पाचव्यांदा व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी कपात दिसून आली.

सलग 5 व्या महिन्यात आनंदवार्ता

IOCLच्या आकडेवारीनुसार, देशाच्या राजधानीसह चार महानगरातील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत सलग 5 व्या महिन्यात घसरण दिसून आली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 33.5 रुपयांची घसरण दिसली. आता हा भाव 1631.50 रुपयांवर आला आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 34 रुपयांची घसरण झाली. आर्थिक राजधानीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1582.50 रुपयांवर आली. कोलकत्ता आणि चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 34.5 रुपयांची कपात झाली. दोन्ही शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची क्रमशः 1734.50 आणि 1789 रुपये अशी किंमत आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत नाही बदल

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत एप्रिल महिन्यानंतर कोणताच बदल झाला नाही. एप्रिल महिन्यात किंमतीत 50 रुपयांची दरवाढ झाली होती. 8 एप्रिल रोजी मोदी सरकारने याविषयीची घोषणा केली होती. त्यानंतर किंमतीत कोणताही बदल दिसला नाही. IOCL च्या आकड्यांनुसार, चार मोठ्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जैसे थे आहे. यामध्ये दिल्लीत 853 रुपये, कोलकातामध्ये 879 रुपये, मुंबईमध्ये 852.50 आणि चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 868.50 रुपये इतकी आहे. जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमती कमी झाल्याने व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्याचे समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.