AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Down : गुडन्यूज! मे महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडर स्वस्त, नवीन भाव तरी काय?

LPG Price Down : ग्राहकांसाठी आनंदवार्ता आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहाकांना दिलासा मिळाला. गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे महागाईत ग्राहकांच्या खिशाला कमी झळ बसणार आहे.

LPG Price Down : गुडन्यूज! मे महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडर स्वस्त, नवीन भाव तरी काय?
एलपीजी गॅस सिलेंडर भाव कमीImage Credit source: गुगल
| Updated on: May 02, 2025 | 9:39 AM
Share

मे महिन्याचा पहिला दिवस ग्राहकांसाठी दिलासा घेऊन आला. उन्हाच्या झळांनी सध्या नागरिक त्रस्त आहेत. त्यातच ही आनंदवार्ता येऊन धडकली आहे. गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात किंमती भडकल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती गेल्या दहा वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. ती खरी नागरिकांची चिंता आहे. यापूर्वी गॅस दर इतके भडकले नव्हते. या महिन्याच्या सुरुवातीलाच किंमती घसरल्याने ग्राहकांना आता हॉटेलिंगचा आनंद घेता येईल.

व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी

या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत (19 किलो) घसरण झाली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत (14.2 किलो) कोणताही बदल झाला नाही. गेल्या वेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तात्काळ प्रभावाने वधारल्या होत्या. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत ही सातत्याने बदल होत आहे. तर अनेक दिवसांपासून घरगुती गॅसच्या किंमती अटोक्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमत जैसे थे आहेत. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाले आहे.

आता भाव काय?

ताज्या अपडेटनुसार, दिल्लीत आतापर्यंत 19 किलोच्या गॅससाठी ग्राहकांना 1747.50 रुपये द्यावे लागतील. एप्रिल महिन्यात हेच सिलेंडर 1762 रुपयांना मिळत होते. तर मार्च महिन्यात एका गॅस सिलेंडरसाठी 1803 रुपये मोजावे लागत होते. म्हणजे गेल्या एका महिन्यात 14.5 रुपये आणि दोन महिन्यात एकूण 55.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांना या कपातीचा मोठा फायदा झाला आहे. त्यांचा खर्च कमी झाला आहे.

कोणत्या शहरात आता काय भाव

दिल्ली : 1,747.50 रुपये (एप्रिल महिन्यात 1,762 रुपये)

कोलकाता : 1,851.50 (1,868.50 रुपये)

मुंबई : 1,699 रुपये ( एप्रिल 1,713.50 रुपये)

चेन्नई : 1,906.50 रुपये ( एप्रिल 1,921.50 रुपये)

सलग दुसर्‍यांदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. 1 एप्रिल रोजी दिल्लीत सिलेंडरची किंमत 41 रुपयांनी स्वस्त झाली. तर आता किंमतीत 14.50 रुपयांची कपात झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 8 एप्रिल 2025 रोजी मोठा बदल झाला होता. 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरची किंमत गेल्या वर्षभरापासून स्थिर होत्या. पण त्यात आता 50 रुपयांची वाढ दिसून आली. 1 मे पर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती शहरानुसार अशा आहेत.

दिल्ली : ₹853

कोलकाता : ₹879

मुंबई : ₹852.50

चेन्नई : ₹868.50

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.