एलपीजीच्या दरवाढीतून मिळेल दिलासा, 50 रुपये वाचतील, त्यासाठी अशी करा बुकिंग

एलपीजीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काही रुपये कमी झाले तरी मोठा दिलासा मिळणार आहे. बुकिंगच्या माध्यमातून नागरिक 50 रुपये वाचवू शकणार आहेत. (LPG price hike will bring relief, save Rs 50 on booking)

एलपीजीच्या दरवाढीतून मिळेल दिलासा, 50 रुपये वाचतील, त्यासाठी अशी करा बुकिंग
LPG
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 3:22 PM

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांत घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा तर मार्चच्या पहिल्या दिवशी किंमतीत वाढ झाली. फेब्रुवारीत चार टप्प्यात गॅसची किंमत तब्बल 125 रुपयांनी वाढली. या महागाईच्या काळात इंडियन ऑईलने आपल्या ग्राहकांना स्वस्त सिलिंडर घेण्याची संधी दिली आहे. कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून ही खुशखबर दिली आहे. यात म्हटले आहे की, जर तुम्ही अमेझॉन अपच्या मदतीने बुकिंग आणि पेमेंट केले तर 50 रुपये वाचू शकतील. ग्राहकांना 50 रुपये कॅशबॅक मिळतील. सध्या 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅसची किंमत दिल्लीमध्ये 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये, मुंबईमध्ये 819 रुपये आणि चेन्नईमध्ये 835 रुपये आहे. (LPG price hike will bring relief, save Rs 50)

अशी झाली गॅसची दरवाढ

1 मार्चला एलपीजी गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ झाली. त्या आधी 25 फेब्रुवारीला 25 रुपये, 15 फरवरीला 50 रुपये आणि 4 फेब्रुवारीला किंमतीत 25 रुपये दरवाढ झाली. जानेवारीत कोणतीही वाढ झाली नव्हती. डिसेंबर महिन्यात 1 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला 50-50 रुपयांची वाढ झाली होती.

19 किलोग्रॅमच्या सिलिंडरचा दर

मार्चच्या पहिल्या दिवशी 19 किलोग्रामच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 95 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीत 1614 रुपये, कोलकातामध्ये 1681.50 रुपये, मुंबईत 1563.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1730.50 रुपये आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाईटवर कंपन्यांनी प्रत्येक महिन्याचे नवीन दर जारी केले आहेत. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर जाणून घेऊ शकता.

देशभरासाठी एकाच नंबरवरुन बुकिंग

पूर्वी इंडियन ऑईलमध्ये एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या मंडळांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर असायचे. आता हे संपूर्ण देशासाठी समान केले गेले आहे. म्हणजेच, जरी आपण कोणत्याही वर्तुळात राहत असलात तरीही आपल्याला फक्त एका क्रमांकासह गॅस सिलिंडर बुक करण्याची सुविधा मिळेल. ग्राहक 7718955555 या नंबरवर कॉल करून किंवा संदेश पाठवून गॅस सिलिंडर बुक करु शकतात. (LPG price hike will bring relief, save Rs 50)

इतर बातम्या

100 वर्षे जुन्या CBSE बोर्डाविरोधात नवा शैक्षणिक बोर्ड उभा करु शकतील केजरीवाल? दिल्ली सरकारची मोठी घोषणा 

माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, मुख्यमंत्र्यांनी भराडीदेवीकडे आशीर्वाद मागितला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.