माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, मुख्यमंत्र्यांनी भराडीदेवीकडे आशीर्वाद मागितला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CMUddhav Thackeray) यांनी भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली.

माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, मुख्यमंत्र्यांनी भराडीदेवीकडे आशीर्वाद मागितला
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 2:40 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांनी भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली. आंगणेवाडीच्या (Aanganewadi) जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांना धन्यवादही दिले. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद भराडी देवीकडे (Bharadi devi) मागतांना मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली. (Every particle of my energy be spent for the development of Maharashtra, CM Uddhav seeks blessings from Bharadi Devi)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापूरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी ता. मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे ता. कणकवली जि. सिंधुदूर्ग या योजनांचे ऑनलाईन भुमीपुजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

अंगणेवाडीची जत्रा ही कोकणवासीयांचे श्रद्धास्थान

इतकी वर्षे या जत्रेबद्दल मी ऐकत होतो, गेल्यावर्षी तिथे मुख्यमंत्री म्हणून तिथे येता आलं याचे खुप समाधान आहे. यावेळी कोरोनामुळे आभासीपद्धतीने तुमच्याशी बोलत आहे. आभासी शब्द मला आवडत नाही. पण पर्याय नाही. आज जरी मी तिथे तुमच्यात प्रत्यक्ष नसलो तरी मनाने मी तिथेच आहे.

माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे

]मला गेल्यावर्षीचे भक्तांनी फुलून गेलेले मंदिर आठवते. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्षे मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत याचा निश्चित आनंद आहे. भराडी मातेला वंदन करून प्रत्येकजण काही ना काही मागतो पण मी भराडी मातेला विनंती करतो की माझ्या शक्तीचा कण न कण कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरता येऊ दे, माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे.

आंगणेवाडीच्या जत्रेसंदर्भात माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार

कोव्हिड काळात आपण काम करत आहोत. अनेकजपण भराडी देवीच्या उत्सवाची वाट पाहत आहेत मला माहित आहे, पण आज आपण सगळेजण एकत्र येऊन कोरोना नामक संकटाचा मुकाबला करतो आहोत. आपण सगळे सहकार्य करत आहेत म्हणून कारोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत. यावेळी आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांना धन्यवादही दिले.

भूमिपुजनाला ऑनलाईन पण उद्घाटनाला प्रत्यक्षात येणार, हे माझं तुम्हाला वचन

राज्यात अनेक धरण, पाटबंधारे झाले पण अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. नुकताच मी तिकडे जाऊनही आलो. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भुमीपुजन ऑनलाईन करतो आहोत पण धरणाच्या उदघाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे  तुम्हाला वचन आहे, असं उद्धव म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

अनेकजण स्वत:साठी काही ना काही मागत असतात पण मला आनंद आहे की कोकणातील माझे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्‍वस्‍त म्हणून काम करत आहेत, स्वत:साठी काही न मागता जनतेसाठी हॉस्पीटल आणि इतर गोष्टी मागत आहेत, असा टोला त्यांनी राणेंना लगावला.

रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार

रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सुरु असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सांगितले.

कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच

संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे, निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधी लपवलेले नाही म्हणूनच मी गेल्यावर्षी भराडी देवीच्या दर्शनाला आलो होतो तेंव्हा आपण सगळ्यांनी मिळून  कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असतांना कोरोना आला आणि सगळं ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

चिपीचे विमानतळ लवकरच सुरु होईल

चिपीचे विमानतळ लवकरच सुरु होईल. ते सुरु केल्यानंतर मी तुमच्या मागे लागणार आणि विकासासाठी दरवाजे उघडण्याचे आवाहन करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. माझा कोकण संपन्न झालाच पाहिजे, यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासियांना माता भगिनींना देतो.

(Every particle of my energy be spent for the development of Maharashtra, CM Uddhav Thackeray seeks blessings from Bharadi Devi)

हे ही वाचा :

तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं, नाही तर लोक स्वत:साठी मागतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.