AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market This Week | सलग चौथ्या आठवड्यात बाजारात तेजी, जाणून घ्या गुंतवणूकदारांनी कुठे केली कमाई

Stock Market This Week | या आठवड्यात, BSE 500 मधील 290 शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. तर 15 शेअरमध्ये गुंतवणूकदारांच्या रक्कमेत 10 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली.

Stock Market This Week | सलग चौथ्या आठवड्यात बाजारात तेजी, जाणून घ्या गुंतवणूकदारांनी कुठे केली कमाई
बाजारात उताराचे सत्रImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 13, 2022 | 1:55 PM
Share

Stock Market This Week | शेअर बाजारात (Share Market) सध्या काही दिवसांपासून सुगीचे दिवस आहेत. सलग काही सत्रात अपेक्षित वाढ मिळाल्याने गुंतवणूकदारांचा(Investors) जीव भांड्यात पडला आहे. शेअर बाजारातील वाढीचा कल कायम आहे. हा सलग चौथा आठवडा आहे, जेव्हा बाजारात तेजीसह बंद झाला आहे. म्हणजे गेल्या एक महिन्यापासून बाजाराने तेजीचा रस्ता धरला आहे. 12 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात शेअर बाजारात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. परदेशी बाजारातील मजबूती आणि देशांतर्गत आघाडीचे सकारात्मक संकेत हे शेअर बाजारातील या आठवडय़ातील तेजीची प्रमुख कारणे मानण्यात येत आहेत . सध्या पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदारांनी(FII) शेअर बाजाराचा रस्ता मजबूत केला आहे. परिणामी बाजारात चैतन्यदायी वातावरण आहे. या आठवड्यात, BSE 500 मध्ये समाविष्ट 290 शेअर तेजी नोंदवत बंद झाले.

या आठवड्यातील व्यवसाय

या आठवड्यात सेन्सेक्स 1075 अंकांच्या, 1.84 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर, निफ्टी 301 अंकांनी वधारला आणि निर्देशांक आठवड्यात 1.72 टक्क्यांनी वाढला आहे. BSE लार्ज कॅप इंडेक्स 2 टक्के, मिडकॅप इंडेक्स 1 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1 टक्क्यांनी वधारला. आठवडाभरात बीएसई मेटल इंडेक्स 5 टक्के, कॅपिटल गुड्स इंडेक्स 4 टक्के आणि पॉवर सेक्टर 3.6 टक्क्यांनी वधारला आहे. FMCG निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला आहे.

विदेशी इन, देशी बाहेर

आठवड्याभरात विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी सुरूच राहिली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी 7850 कोटी रुपयांची इक्विटी खरेदी केली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सुमारे 2500 कोटी रुपयांची इक्विटी विक्री केली. आॅगस्टमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात सुमारे 15 हजार कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 4,243 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

गुंतवणूकदारांनी कुठे केली कमाई

आठवड्यात, BSE 500 मधील 290 शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. त्याच वेळी, 15 शेअर्सनी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याच वेळी, केवळ 2 समभागांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक तोटा झाला. BEML 24 टक्के, IGL 22 टक्के, टाटा केमिकल्स 18 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे, वंडरला हॉलिडेज, फोर्ब्स गोकाक, कॅमकॉन स्पेशालिटी केमिकल्स, बीईएमएल, कॅपसाइट इन्फ्राप्रोजेक्ट्स, गायत्री प्रोजेक्ट्स स्मॉल कॅप्समध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.

पण ही सूचना कशासाठी

दरम्यान अमेरिकेसह काही देशांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत सावध गुंतवणुकीचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते येत्या काही काळात भारतीय बाजारात घसरण दिसून येऊ शकते. डिसेंबरपर्यंत असे संकेत मिळू शकतात असा त्यांचा दावा आहे. पण एकूणच सर्वच क्षेत्रात सुरु असलेली घौडदौड बघता ही सूचना कशासाठी देण्यात आली हा प्रश्न विदेशी गुंतवणूकदारांना नक्कीच पडला असणार

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.