AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधून गुंडाळला गाशा, २५ वर्षांच्या भागीदारीचा शेवट, काय ठरले कारण?

२५ वर्षांपर्यंत पाकिस्तानचा डिजिटल चेहरा बदण्यात मोठी भूमिका बजावणारी ग्लोबल टेक कंपनीने अचानक पाकिस्तानातून आपला कारभार आटोपला आहे. कोणतीही अधिकृत घोषणा, ना प्रेस रिलीज केवळ एका जुन्या अधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने कळले की मायक्रोसॉफ्टने गाशा गुंडाळला आहे.

मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधून गुंडाळला गाशा, २५ वर्षांच्या भागीदारीचा शेवट, काय ठरले कारण?
| Updated on: Jul 04, 2025 | 6:33 PM
Share

आपला शेजारी पाकिस्तानच्या डीजिटल प्रगतीत मोठी भूमिका निभावल्यानंतर टेक जगताली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने अचानक पाकिस्तानातून आपला गाशा गुंडाळत टाटा बाय बाय केले आहे. ३ जुलै २०२५ रोजी मायक्रोसॉफ्टने कोणतीही अधिकृत घोषणा न करता पाकिस्तानातील तिचे ऑपरेशन बंद केले आहे. ही माहीती मायक्रोसॉफ्टचे पाकिस्तानचे आधीचे प्रमुख जाव्वाद रहमान यांनी सोशल मीडियावर ‘एका युगाचा अंत’ अशी पोस्ट करीत दिली आहे.

मायक्रोसॉफ्टने पाकमधला कारभार का आटोपला ?

मायक्रोसॉफ्टने आपल्या निर्णयामागचे कोणतेही अधिकृत कारण सांगितलेले नाही. परंतू या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहीतीनुसार हे पाऊल कंपनीने पाकिस्तानची बिघडती राजकीय घडी आणि आर्थिक स्थितीमुळे उचलले आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

परदेशी चलन साठा घटून ११.५ अब्ज डॉलर उरला आहे

२०२४ मध्ये व्यापार तोटा २४.४ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला

वारंवार सरकारे बदलणे आणि धोरण अस्थिरता

तांत्रिक हार्डवेअरच्या आयातील अडचणी आणि जाचक कर

या सर्वांमुळे कोणत्याही ग्लोबल कंपनीला तेथे टीकून राहणे अवघड बनले असते. त्या सर्व मुद्यांशिवाय कंपनीला गुंतवणूकीपासून फंड ट्रान्सफर आणि आयात आणि निर्यातीत अडचणी येत होत्या.

भारत-पाकिस्तान व्यापार तणावाचा भर

साल २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तानचा व्यापार ३ अब्ज डॉलर होता. तोच आता २०२४ मध्ये घसरुन केवळ १.२ अब्ज डॉलर राहीला आहे. गरजेच्या वस्तूही आता त्रयस्त देशातून मागवाव्या लागत आहेत. ज्यामुळे भांडवल आणि वेळ दोन्ही वाढत आहेत. हे सर्व परदेशी कंपन्यांसाठी हा एक निगेटिव्ह संकेत बनत आहे.

व्हीएतनाममध्ये सेटल होणार कंपनी

साल २०२२ मध्ये कंपनीने पाकिस्तानात विस्तार करण्याची योजना आखली आहे. परंतू परिस्थिती बिघडल्यानंतर मायक्रोसॉफ्टने व्हीएतनामकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या दोन वर्षात कंपनीने अनेक लोकल पार्टनरशिप्स आणि प्रोग्रॅम्स देखील बंद केले आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.