आता जणू डिजिटल युनिक अकाऊंट; UPI शी लिंक होतील मोबाईल वॉलेट

UPI Payment App : आजही देशातील कोट्यवधी लोक डिजिटल पेमेंट्स ॲपवरील वॉलेटचे फीचर वापरतता. यामध्ये गुगल पे, फोन पे, ॲमेझॉन आणि इतर अनेक ॲपचा वापर करण्यात येतो. मोबाईल वॉलेट हे युपीआयपेक्षा वेगळे असते. हे एक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) आहे. यामध्ये रक्कम अगोदरच जमा करावी लागते. यासंबंधीच्या नियमात आता बदल होत आहे.

आता जणू डिजिटल युनिक अकाऊंट; UPI शी लिंक होतील मोबाईल वॉलेट
आरबीआयची नवीन सुविधा
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 2:40 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएमवर बंदी घातली. त्यानंतर इतर पण अनेक युपीआय ॲप सतर्क झाले. आरबीआयने ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत ही कारवाई केली आहे. ग्राहकांचे हित जपण्यासाठी आणि झटपट व्यवहारासाठी केंद्रीय बँकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मोबाईल वॉलेट ही युपीआयपेक्षा वेगळी व्यवस्था आहे. त्यात अगोदरच पैसा जमा करावा लागतो. आता युपीआय आणि मोबाईल वॉलेट जोडता येणार आहे. मोबाईल वॉलेट हे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. त्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल होत आहे. त्याचा ग्राहकांना थेट फायदा होईल.

कसे काम करेल हे वॉलेट

  1. सध्या तुम्ही ज्या कंपनीच्या ॲपचे वॉलेट वापरता, त्या पैशांचा वापर त्याच कंपनीच्या वॉलेटमध्ये हस्तांतरणासाठी होतो. हा पैसा वापरण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी युपीआयचा वापर करावा लागतो. हा पैसा समोरच्या व्यक्तीच्या त्याच्या वॉलेटमध्ये जमा होतो.
  2. याचा अर्थ, तुम्ही कोणत्याही एका ॲपच्या वॉलेटमधील पैसा दुसऱ्या कोणत्या ॲपच्या वॉलेटमध्ये हस्तांतरीत करु शकत नाही. त्यावर पर्याय शोधण्याचा आरबीआयचा प्रयत्न होता. आरबीआयचा प्रस्ताव आहे की, तुमच्या मोबाईल वॉलेटला थर्ड पार्टी युपीआय ॲप्लिकेशनसोबत (फोन पे, गुगलपे) लिंक करण्यात येईल. त्यामुळे तुमचे वॉलेट एखाद्या डिजिटल अकाऊंटसारखे काम करेल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एप्रिल महिन्यातील पतधोरण समितीच्या बैठकीनंतर याविषयीची घोषणा केली होती. त्यानुसार, पीपीआय धारकांना अधिक सवलत, सुविधा पुरविण्याची घोषणा करण्यात आली. पीपीआय थर्ड पार्टी युपीआय ॲपसोबत लिंक करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल वॉलेटमधून पण सर्व बँक खात्याप्रमाणेच युपीआय पेमेंट करता येईल.

सर्वसामान्य नागरिकांना काय होईल फायदा

ET च्या वृत्तानुसार, आरबीआयच्या या नवीन सेवेमुळे सर्वसामान्य नागिरकांना मोठा फायदा होईल. ग्राहक आता कोणत्याही युपीआय ॲपच्या माध्यमातून कोणत्याही वॉलेटला सहज एक्सेस करु शकेल आणि पेमेंट करु शकेल. म्हणजे जर तुमच्याकडे फोनपे वॉलेट आहे. त्यात पैसे असतील. तुम्ही गुगल पेमधून पेमेंट करत असाल तर फोनपेच्या वॉलेटमधील पैसे सुद्धा तुम्हाला या व्यवहारासाठी वापरता येतील.

Non Stop LIVE Update
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.