आजपाससून Mrs Bectors Food च्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना मिळणार संधी, वाचा संपूर्ण योजना
2020 चा हा 15 वा आयपीओ असणार आहे. बेकर्स फूडने अँकर इन्व्हेस्टर्सकडून 162 कोटी रुपये जमा केले आहेत.

नवी दिल्ली : क्रिमिका (Cremica) ब्रँड अंतर्गत बिस्किट बनवणारी कंपनी मिसेस बेकर्स फूड स्पेशलिटीजची (Mrs Bectors Food Specialities) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) आज अर्थात 15 डिसेंबरला सबस्क्राइबसाठी उघडणार आहे. 2020 चा हा 15 वा आयपीओ असणार आहे. बेकर्स फूडने अँकर इन्व्हेस्टर्सकडून 162 कोटी रुपये जमा केले आहेत. एसबीआय कॅपिटल मार्केट्स (SBI Capital Markets), आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) आणि आयआयएफएल सिक्युरिटीज हे या आयपीओचे व्यवस्थापक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयपीओद्वारे 540.54 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. तर 286-288 रुपये अशी या आयपीओची किंमत निश्चित केली गेली आहे. (mrs bectors food ipo open today here know price band and how to invest in ipo)
50 शेअर्सचा लॉट
बेकर्स फूड स्पेशॅलिटीज आयपीओचे लॉट साइज 50 शेअर्सचा आहे. या आयपीओ अंतर्गत 40.54 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. इतकंच नाही तर ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचे शेअर्स दिले जाणार आहेत.
कर्मचार्यांना प्रति शेअर 15 रुपये सूट
बेकर्स फूड स्पेशलिटीच्या कर्मचार्यांना प्रति शेअर 15 रुपये सूट मिळणार आहे. तर 50 लाख रुपयांचे शेअर्स त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आयपीओअंतर्गत 50% शेअर क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी आरक्षित असून 35% समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) राखीव आहे.
ऑफर्सच्या माध्यमातून शेअर्सची विक्री
या आयपीओमध्ये ऑफरद्वारे लिनस प्रायव्हेट लिमिटेड 245 कोटींच्या इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे. त्याचबरोबर, माबेल प्रायव्हेट लिमिटेड 38.5 कोटी रुपये, जीडब्ल्यू क्राउन पीटीई लिमिटेड 186 कोटी रुपये आणि जीडब्ल्यू कन्फेक्शनरी पीटीई लि. एकूण 30.5 कोटी रुपयांचे शेअर्स विकले जाणार आहे.
या कंपनीचा प्रसिद्ध बिस्किट ब्रँड ‘Mrs. Bector’s Cremica’ पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये लोकप्रिय आहे. त्याच बरोबर ‘English Oven’ हा दिल्ली एनसीआर, मुंबई आणि बेंगलुरु मधील विक्रीचा प्रीमियम ब्रेकरी ब्रँड आहे. (mrs bectors food ipo open today here know price band and how to invest in ipo)
इतर बातम्या –
लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय
वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला मिळतील 30 हजार रुपये, ‘या’ बँकेत सोप्या पद्धतीने उघडा खातं
(mrs bectors food ipo open today here know price band and how to invest in ipo)
