मुकेश अंबानींच्या चुलतभावाचा पगार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क, नीता अंबानी किती कमावतात?

तर त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी प्रत्येक मीटिंगसाठी आठ लाख रुपये आणि कमिशन घेतल्याचीही माहिती समोर आलीय. रिलायन्सच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती मिळाली. mukesh ambani nita ambani corona salary

नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची (Mukesh Ambani) एकूण संपत्ती नुकतीच वाढलीय. ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या स्थानावर आलेत, परंतु आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की, कोरोना कालावधीत अंबानी यांनी कंपनीकडून कोणताही पगार घेतला नाही. त्यांनी स्वत: च्या स्वेच्छेचे पगारावर पाणी सोडलं. तर त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी प्रत्येक मीटिंगसाठी आठ लाख रुपये आणि कमिशन घेतल्याचीही माहिती समोर आलीय. रिलायन्सच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती मिळाली. (mukesh ambani did not take salary during corona nita ambani took 8 lakh in every meeting)

रिलायन्स समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा 24 जून रोजी होणार आहे. पण त्याआधी कंपनीने आपला वार्षिक अहवाल जाहीर केला. त्यानुसार 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अंबानी यांचा मोबदला ‘शून्य’ होता. कोरोना साथीच्या काळात लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी आपला पगार घेतला नाही. हे पैसे कंपनीच्या कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी वापरले जात आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी कंपनीकडून पगार म्हणून 15 कोटी रुपये घेतले होते. मजेशीर गोष्ट म्हणजे ती 15 वर्षांपासून त्यांच्या पगाराची रक्कम एकच आहे. त्यात वाढ झालेली नाही.

बायको आणि चुलतभावांनी किती पैसे कमावले?

कंपनीच्या बोर्डावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असलेली अंबानी यांची पत्नी नीता अंबानी तिच्या उपस्थितीतील प्रत्येक मीटिंगसाठी आठ लाख रुपये घेते. एवढेच नव्हे तर कमिशन म्हणून त्यांना 1.65 कोटी रुपयेही मिळाले. दुसरीकडे जर अंबानीचे चुलत भाऊ निखिल आणि हितल मेसवानी यांच्या पगाराचा विचार केला, तर त्यांचा मोबदला 24 कोटी रुपये आहे, परंतु त्यात 17.28 कोटी रुपयांचे कमिशन आहे.

इतर सदस्यांच्या पगारामध्ये वाढ

यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक पी. एम. एस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या पगारातही वाढ झालीय. 2020-21 या आर्थिक वर्षात प्रसाद यांना 11.99 कोटी रुपये मिळाले. तर मागील वर्षी त्यांना 11.15 कोटी रुपये मिळाले. पवन कुमार कपिलचा पगारही वाढलाय. यावेळी त्यांना 4.24 कोटी रुपये मोबदला मिळाला. यापूर्वी ते 4.04 कोटी रुपये होते. या व्यतिरिक्त इतर सर्व स्वतंत्र संचालकांना 1.65 कोटी रुपये कमिशन आणि 36 लाख रुपयांपर्यंत मीटिंगची फी मिळाली.

संबंधित बातम्या

मोदींच्या कारभारावरही नरसिंह राव अन् मनमोहन सिंग भारी; कॉंग्रेस PM च्या कार्यकाळातच गुंतवणूकदारांची सर्वाधिक कमाई

LIC IPO: ‘या’ महिन्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता, लिस्टिंगनंतर कंपनी यादीत रिलायन्सला टाकेल मागे

mukesh ambani did not take salary during corona nita ambani took 8 lakh in every meeting

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI