नवी दिल्ली : देशातील दोन दिग्गज उद्योजकांची नावे जागतिक श्रीमंतांच्या टॉप यादीत झळकत आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पिछाडीवर टाकत गौतम अदाणी यांनी (Gautam Adani) यांनी आघाडी घेतली आहे. तरीही रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) मूल्यमापन, महसूल आणि नफा या महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर अग्रेसर आहे. बुरगुंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500 यादी, 2022 (Burgundy Private Hurun India 500 list) मध्ये याविषयीचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील आघाडीच्या अदाणी, अंबानी आणि टाटासह इतर कंपन्यांचा अनेक क्षेत्रात बोलाबाला असल्याचे दिसून येते.