Multibagger Stock : या पेनी स्टॉकमुळे एका वर्षातच गुंतवणूकदार मालामाल, 1 लाख रुपयांचे झाले 20 लाख, शेअरची किंमत वाढली झरझर

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 05, 2023 | 7:57 PM

Multibagger Stock : या पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदार वर्षभरातच मालामाल झाले.

Multibagger Stock : या पेनी स्टॉकमुळे एका वर्षातच गुंतवणूकदार मालामाल, 1 लाख रुपयांचे झाले 20 लाख, शेअरची किंमत वाढली झरझर
दमदार कामगिरी

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) सरते वर्ष कटुगोड आठवणीने भरलेले होते. गुंतवणूकदारांना (Investors) जबरी फटका बसला. तर काही स्टॉक्सनी त्यांना मोठा दिलासा दिला. बाजार हिंदोळ्यावर असतानाही काही शेअर्सनी कमाल केली. त्यांनी गुंतवणूकदारांचा मोठा फायदा करुन दिला. विशेष म्हणजे दिग्गज कंपन्यांचे शेअर तोंडावर आपटले असताना काही पेनी शेअर्सची (Penny Shares) कामगिरी वाखण्याजोगी होती. हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर (Multibagger Return) ठरले. त्यांना कमाईची मोठी संधी मिळाली.

हेमांग रिसोर्सेज (Hemang Resources) या कंपनीने 2022 मध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवला. हा शेअर मल्टिबॅगर ठरला. त्याने गुंतवणूकदारांना वर्षभरातच मालामाल केले. या शेअरने बेंचमार्क इंडेक्सपेक्षा जास्त परतावा दिला. Hemang Resources च्या शेअरने वर्षभरातच 3.25 रुपयांहून 66 रुपये प्रति शेअरची भरारी घेतली.

एकाच वर्षात Hemang Resources च्या स्टॉकने जवळपास 1900 टक्क्यांचा परतावा दिला आहे. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे समजण्यात येते. पण व्यापारी अनेकदा गुंतवणुकीसाठी जोखीम असलेले पेनी शेअरची निवड करतो. त्यासाठी त्या कंपनीचे व्यवस्थापन आणि कर्ज स्थिती याचा अभ्यास करण्यात येतो. त्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

ही कंपनी BSE मध्ये सूचीबद्ध आहे. गेल्या वर्षी हा शेअर जवळपास 3.25 प्रति शेअर मिळत होता. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिले नाही. हा शेअर आता 66 प्रति शेअर आहे. शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 1900 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात या शेअरने दोनदा अप्पर सर्किट भेदले आहे. या कालावधीत शेअरने 5.50 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

गेल्या महिन्यात हेमांग रिसोर्सेजचा शेअर 56.50 रुपये प्रति शेअर होता. त्यानंतरही त्याची घौडदौड सुरुच होती. हा शेअर 66 रुपये प्रति शेअरवर पोहचला. गेल्या काही महिन्यांपासून हा शेअर 45.20 रुपयांहून 66 रुपये प्रति शेअरवर पोहचला आहे. या काही महिन्यातच या शेअरने 45 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

बाजारातील घडामोडींनुसार या शेअरची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही. तुमचा अभ्यास आणि बाजारातील तज्ज्ञांच्या आधारे गुंतवणूक करणे अधिक हितवाह ठरते.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI