Multibagger Stock | हा तर निघाला छुपा रुस्तम, या शेअरने केले मालामाल

Multibagger Stock | इंजिनिअरिंग कंपनीने गुंतवणूकदारांना 5 वर्षांतच मालामाल केले. या कालावधीत या कंपनीने गुंतवणूकदारांचा पैसा 10 पट केला. या कामगिरीने शेअर बाजारात या शेअरने कमी कालावधीत जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत स्थान पक्के केले. या परताव्यामुळे गुंतवणूकदारांची दिवाळी गोड झाली.

Multibagger Stock | हा तर निघाला छुपा रुस्तम, या शेअरने केले मालामाल
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 10:46 AM

नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखिमेची असते. पण काही स्टॉक्स गुंतवणूकदारांचे नशीब उघडतात. काही शेअर, गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न देतात. त्यांना मालामाल करतात. ते गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर खरे उतरतात. दिग्गज कंपन्या जी कामगिरी करत नाहीत, अशी अविश्वसनीय कामगिरी हे शेअर करतात. या इंजिनिअरिंग कंपनीने अशीच कामगिरी बजावली आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांची रक्कम दहा पट वाढवली. त्यांना पाच वर्षांतच या कंपनीने मालामाल केले. एक लाख रुपयांचे 10 लाख रुपये केले. परतावा देण्यात या कंपनीने काहीच हातचे राखून ठेवले नाही.

5 वर्षांत वधारली शेअरची किंमत

ट्यूब इन्व्हेसमेंट ऑफ इंडिया लिमिटेड (Tube Investments Of India Ltd) असं या कंपनीचे नाव आहे. कंपनीचा शेअर गेल्या पाच वर्षांत गगनाला भिडला आहे. हा शेअर 299 रुपयांहून 3,209 रुपयांवर पोहचला आहे. 5 वर्षांपूर्वी 9 नोव्हेंबर 2018 रोजी या कंपनीचा एक शेअर 299 रुपयांवर होता. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिलेच नाही. या शेअरने या कालावधीत 970 टक्क्यांहून अधिकचा मल्टिबॅगर रिटर्न दिला. मंगळवारी हा स्टॉक 2.16 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आता सकाळच्या सत्रात 10:33 वाजता 3,241 रुपयांवर ट्रेड करत होता.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांचे उघडले नशीब

या शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब उघडले. पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या शेअरमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली. त्यांची गुंतवणूक आता 10 लाख रुपये झाली आहे. गेल्या सहा वर्षांत या स्टॉकने 1100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. म्हणजे 6 वर्षांत या स्टॉकने 11 लाखांचा परतावा दिला आहे.

काय करते कंपनी ट्यूब इन्व्हसेमेंट ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारतीय इंजिनिअरिंग आणि पूनर्निर्माण कंपनी आहे. ती सायकल, विविध धातूचे उत्पादने आणि इतर खास उत्पादने तयार करते. या कंपनीचे मुख्यालय चेन्नई शहरात आहे. मुरुगप्पा ग्रुपची ही कंपनी आहे. या कंपनीचा शेअर 9 नोव्हेंबर 2018 रोजी 299.90 रुपये होती. 8 नोव्हेंबर 2019 रोजी हा शेअर 438.45 रुपयांवर पोहचला. तर 6 नोव्हेंबर 2020 रोजी शेअर 689.15 रुपये होता. 4 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीचा एक शेअर 1662.70 रुपयांवर पोहचला. तर गेल्या वर्षी हा शेअर 11 नोव्हेंबर रोजी 2,573.15 रुपयांवर होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.