Multibagger Stock | 50 रुपयांनी नशीब पालटलं! या शेअरने अनेकांना मालामाल केलं

Multibagger Stock | अनेकांना कायम वाटत असते की त्यांचे नशीब झोपा काढत आहे. पण नशीबाने नाही तर योग्य निर्णयाने आयुष्यात अनेक गोष्टी घडतात आणि बदलतात. हा शेअर ज्यांनी योग्यवेळी खरेदी केला त्यांना मोठा फायदा झाला. या शेअरची किंमत 1 रुपयांपेक्षा कमी होती. आता हा शेअर 1000 टक्क्यांनी उसळला आहे.

Multibagger Stock | 50 रुपयांनी नशीब पालटलं! या शेअरने अनेकांना मालामाल केलं
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 3:05 PM

नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून कोसळधार सुरु आहे. बाजारात जो तो गुंतवणूकदार विक्रीच्या मूडमध्ये आहे. पण दीर्घकालीन सत्रात बाजारात फायदे पण आहेत. चढ-उताराच्या सत्रात दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फायदा होत आहे. घसरण तर स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी भविष्यातील नफ्याची संधी असते, असे म्हणतात. पण त्यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास आणि योग्य निर्णय घेण्याचे कसब लागते. या 50 रुपयांपेक्षा कमी स्टॉकने असेच नशीब पालटवले आहे. कोणता आहे हा चमत्कार करणारा पेन्नी स्टॉक?

Rama Steel Tubes

स्वस्त शेअर म्हणून ओळख असलेल्या Rama Steel Tubes ने गेल्या काही दिवसात मोठी कमाल दाखवलेली नाही. गुरुवारी व्यापारी सत्रात हा शेअर किंचित फायद्यात होता. हा शेअर 38.80 रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या 5 दिवसांत बाजारातील घसरणीच्या लाटेत हा शेअर तग धरु शकला नाही. तो 3 टक्क्यांपेक्षा अधिक घसरला. तर एका महिन्यात 3 टक्क्यांहून अधिक फायद्यात होता. हा शेअर 6 महिन्यात साडेतीन टक्के तर वर्षभरात जवळपास 5 टक्के घसरला.

हे सुद्धा वाचा

2 वर्षात ठरला मल्टिबॅगर

गेल्या दोन वर्षात या शेअरने कमाल केली. हा शेअर मल्टिबॅगर ठरला. आतापासून जवळपास दोन वर्षांपूर्वी जानेवारी 2022 मध्ये हा शेअर 17 रुपयांवर होता. म्हणजे दोन वर्षांत या शेअरने 100 टक्क्यांची झेप घेतली. तर मागील तीन वर्षांत हा शेअर 1000 रुपयांनी उसळला.

कधी होता 1 रुपयांपेक्षा कमी

फार जुनी गोष्ट नाही. साडेतीन वर्षांपूर्वी हा शेअर, Rama Steel Tubes, एक रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत मिळत होता. एप्रिल 2020 मध्ये हा शेअर एक रुपयांपेक्षा पण स्वस्त होता. या शेअरने 52 आठवड्यातील उच्चांक गाठला आहे. हा शेअर 45.20 रुपयांवर होता. गेल्या तीन वर्षांचा विचार करता या शेअरने गुंतवणूकदारांना 45 पटीहून अधिकचा फायदा मिळवून दिला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1,980 कोटी रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.