‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात झाले लाखाचे 2.50 लाख

Share Market | गेल्या वर्षभरात व्हीनस रेमेडिजच्या समभागाने 130.15 रुपयांवरुन 414.05 रुपयांपर्यंत उसळी घेतली आहे. या कालावधीत समभागाची किंमत जवळपास 220 टक्क्यांनी वाढली आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 मध्ये कंपनीच्या समभागात एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य 2.50 लाख रुपये झाले आहे.

'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात झाले लाखाचे 2.50 लाख
शेअर मार्केट


मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे व्हीनस रेमेडीज (Venus Remedies). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे. व्हीनस रेमेडीजने वर्षाला साधारण 150 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. या समभागाची किंमत 165 रुपयांवरुन 414 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

गेल्या वर्षभरात व्हीनस रेमेडिजच्या समभागाने 130.15 रुपयांवरुन 414.05 रुपयांपर्यंत उसळी घेतली आहे. या कालावधीत समभागाची किंमत जवळपास 220 टक्क्यांनी वाढली आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 मध्ये कंपनीच्या समभागात एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य 2.50 लाख रुपये झाले आहे. तर वर्षभरापूर्वी व्हीनस रेमेडिजचे एक लाखांचे समभाग घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 3.20 लाख इतके झाले असेल.

पॅरासिटेमॉलचे पेटंट जिंकले

यावर्षी जूनमध्ये व्हीनस रेमेडीजने पॅरासिटामॉल या औषधाच्या पेटंट अधिकारांवर फ्रेंच कंपनी एससीआर फार्माटॉपसोबत 10 वर्षांची लढाई जिंकली. पॅरासिटामॉल सोल्युशन्सच्या निर्मितीमध्ये पेटंट अधिकारांचा कोणताही अडथळा दूर करण्यासाठी भारतीय औषध कंपनीने कायदेशीर लढाई सुरू केली होती.

व्हीनस रेमेडीजने 2011 मध्ये पेटंटला विरोध केला होता. यानंतर 2018 मध्ये पेटंट मागे घेण्यात आले. तथापि, SCR फार्माटॉपने नंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि बौद्धिक संपदा अपीलीय मंडळ (IPAB) मध्ये धाव घेतली. हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे स्थित व्हीनस रेमेडीज हे जगातील अग्रगण्य पॅरासिटामोल इंजेक्शन उत्पादकांपैकी एक आहे. जगातील 70 हून अधिक देशांमध्ये या इंजेक्शनचा वापर होतो.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

ओलाच्या ई-स्कूटरसाठी कर्ज सहज उपलब्ध होणार, ईएमआय 2999 पासून सुरू, कंपनीने देशातील सर्व बँकांशी केला करार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI