AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील घरविक्रीत घट; गेल्या वर्षीपेक्षा मागणी १४% कमी, ग्राहकांना दिलासा मिळणार?

Mumbai Home Sale Drop : सणासुदीत ऑनलाईन खरेदी, वाहन खरेदीत भारतीयांना मोठे रेकॉर्ड केले. त्याच्या बातम्या आपण वाचल्या. पण घर खरेदीत बड्या शहरात ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसते. मुंबईतील घरविक्रीत घट आली आहे. गेल्यावर्षींपेक्षा मागणीत १४ टक्क्यांची घट नोंदवली गेली.

मुंबईतील घरविक्रीत घट; गेल्या वर्षीपेक्षा मागणी १४% कमी, ग्राहकांना दिलासा मिळणार?
घरांच्या विक्रीत घट
| Updated on: Nov 02, 2025 | 9:30 AM
Share

आपलं छोटसं का असेना पण घर असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. बड्या शहरात घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात इतर कर, महागाई याचा ताळमेळ बसत नसल्यांनी ग्राहकांनी घर खरेदीची योजना पुढे ढकलल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यंदा ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये ११ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या या प्रमाणात १४ टक्क्यांची घट नोंदवली गेली. एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलातही घट होण्याच्या रूपाने दिसून आला.

दिवाळीत घराच्या स्वप्नाकडे फिरवली पाठ

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १३ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली होती. त्याद्वारे राज्य सरकारला १२०५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाच्या वर्षी महसुलात १७ टक्क्यांची घट होत १००४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यंदा ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती. वास्तविक, या सणामध्ये गृहविक्रीला चालना मिळणे अपेक्षित होते. पण सणासुदीतही घर खर्चासाठीचे बजेट जुळत नसल्याने ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

केवळ गेल्या वर्षीच्याच नव्हे, तर गेल्या महिन्याच्या अर्थात सप्टेंबर २०२५ च्या महिन्याच्या तुलनेतदेखील ऑक्टोबर २०२५ या महिन्यात मालमत्ता विक्रीमध्ये ७ टक्क्यांची घट झाली.सप्टेंबर महिन्यात मुंबईत १२ हजार ७० मालमत्तांची विक्री झाली होती. मात्र, ज्या मालमत्तांची विक्री झाली आहे. त्यामध्ये ८० टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असून, २० टक्के मालमत्ता या कार्यालयीन, तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. चालू वर्षात मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार १४१ मालमत्तांची विक्री झाली आहे.

ग्राहकांना दिलासा मिळणार?

घरांच्या मागणीत घसरण झाल्यावर बिल्डर्स, विकासक त्यावर एकतर बड्या ऑफर्स आणतात. अथवा घराच्या किंमती कमी करतात. अथवा इतर काही आमिषं, जॅकपॉट अशा योजना आणून घरांची विक्री करतात. गृह प्रकल्पासाठीचा खर्च निघावा आणि तोटा होऊ नये यासाठी विकासक प्रयत्न करतात. त्यात ग्राहकांचीही फायदा असतो. त्यामुळे जर गृह विक्री अशीच कमी राहिली तर ग्राहकांना भविष्यात सध्याच्या दरांपेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. रिएल इस्टेटमध्ये मंदीचे सावट आल्यावर नवीन गृह प्रकल्पांना विकासक हात घालत नाहीत. त्यांना हे प्रकल्प अंगावर पडण्याची भीती असते. त्यामुळे आहे त्या प्रकल्पांतील घरं विक्रीवर भर देण्यात येतो. त्यासाठी किंमती कमी करण्यात येतात.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.