AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका कॉफीच्या किंमतीत करा SIP; SEBI चे मोठे पाऊल, जगाला पण आश्चर्याचा धक्का

Mutual Fund Investment : एका कॉफीच्या किंमतीत आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आता मोठी रक्कम गुंतवण्याची अट शिथिल होणार आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पूर येणार आहे. काय आहे सेबीचा प्लॅन?

एका कॉफीच्या किंमतीत करा SIP; SEBI चे मोठे पाऊल, जगाला पण आश्चर्याचा धक्का
कमी किंमतीत करा गुंतवणूक
| Updated on: Sep 03, 2024 | 9:34 AM
Share

बाजार नियंत्रक सेबीच्या (SEBI) अध्यक्ष माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) 250 रुपये महिन्याची एसआयपी (Systematic Investment Plan) विषयी उत्साहित दिसल्या. अशा प्रकारच्या एसआयपी लवकरच बाजारात दिसतील. 250 रुपये महिन्याची ही योजना प्रत्येक वर्गाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करेल. या क्षेत्रातील म्युच्युअल फंड मॅनेजर त्यासाठी सहकार्य करतील. माधवी पुरी बूच यांच्या मते स्टारबक्समध्ये 250 रुपयांत एक कॉफी पण येत नाही. पण आता तितक्याच रुपयात सर्वसामान्य गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल. त्यांना पारंपारिक गुंतवणुकीला पर्याय मिळणार आहे.

कमी किंमतीतील एसआयपीला प्रोत्साहन

सीआयआयच्या (CII) एका कार्यक्रमात माधवी पुरी बूच यांनी 250 रुपयांच्या एसआयपीविषयीची कल्पना मांडली. कमी किंमतीतील गुंतवणुकीचा हा पर्याय केवळ लोकांच्या गरजेपुरता नाही तर तंत्रज्ञान पण विकसीत करण्यात आले आहे. त्याआधारे कमी किंमतीतील एसआयपीद्वारे गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करुन दिल्याचे ते म्हणाले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) सह इतर महत्वपूर्ण कंपन्यांची मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आदित्य बिर्ला सन लाईफने घेतली आघाडी

बिझनेस टुडेच्या एका अहवालानुसार, 250 रुपयांचा सिस्टेमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅन (SIP) तयार करण्यासाठी आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडने (Aditya Birla Sun Life Mutual Fund) आघाडी घेतली आहे. कोणत्याही म्युच्युअल फंड हाऊसने पहिल्यांदा असे पाऊल टाकले आहे. अर्थात याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जगाला इतक्या कमी किंमतीतील म्युच्युअल फंडची एसआयपी आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा माधवी पुरी बूच यांनी केला. यामुळे म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक होण्याचा मार्ग मोकळा होईल.

शेअर बाजारात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची

सेबीच्या अध्यक्षा बूच यांनी बाजारातील इकोसिस्टमविषयी माहिती दिली. त्यांच्या मते, बाजारात आता तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावेल. भारत सध्या गुंतवणूक क्षेत्रातील तंत्रज्ञान वापरात जगात अग्रेसर असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे भारतीय शेअर बाजार सुरक्षित आणि गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झाल्याचे त्या म्हणाल्या.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.