AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माय होम ग्रुपचे अजून एक दमदार पाऊल; महा सिमेंटची मोठी वाहन खरेदी, आता सिमेंटचा नाही पडणार तुटवडा

My Home Group MAHA Cement : माय होम ग्रुपने अजून एक दमदार पाऊल टाकले आहे. बाजारात वेळेत आणि अखंडित सिमेंट पुरवठा होण्यासाठी कंपनीने एमटीपीएची उत्पादन क्षमता वाढवली आहे. त्यामुळे आता सिमेंटचा तुटवडा होणार नाही.

माय होम ग्रुपचे अजून एक दमदार पाऊल; महा सिमेंटची मोठी वाहन खरेदी, आता सिमेंटचा नाही पडणार तुटवडा
माय होम ग्रुपचे दमदार पाऊल
| Updated on: Feb 09, 2025 | 12:49 PM
Share

माय होम ग्रुपने अजून एक दमदार पाऊल टाकले आहे. बाजारात सिमेंटची वाढती गरज लक्षात घेता कंपनीने एमटीपीएच्या उत्पादन क्षमतेत वाढ केली आहे. इतकेच नाही तर सिमेंटचा वेळेत आणि अखंडित पुरवठा व्हावा यासाठी 14 चाकी आणि 16 चाकी ट्रक्सची मोठी खरेदी केली आहे. तर ट्रेलर्सची पण खरेदी केली आहे. या वाहनांचा जत्था पोहचला आहे. त्यामुळे बाजारात आता जलद आणि वेळेवर सिमेंट पुरवठा करता येणार आहे.

दोन राज्यात धाकड कंपनी

आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा राज्यात माय होम ग्रुपची मोठी पकड आहे. या दोन्ही राज्यातील बाजारपेठेतील सिमेंटची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील श्रीनगर, मेल्लाचेरुवू येथील नवीन प्लँटमध्ये 2 एमटीपीएची उत्पादन क्षमता वाढवली आहे. बाजारात मजबूत पकड मिळवण्यासाठी कंपनीने नवीन वाहन खरेदी केली आहे. त्याआधारे कंपनी जलदरित्या सिमेंटचा पुरवठा करू शकेल.

सिमेंटचा नाही पडणार तुटवडा

सिमेंटची वाहतूक वेळेत पूर्ण करण्यासाठी या समूहाने 30 एमटी क्षमता असलेल्या 14 चाकी 100 ट्रक्सची खरेदी केली आहे. तर 35 एमटी क्षमता असलेल्या 16 चाकांच्या 100 ट्रक्स पण ताफ्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर कंपनीने 41 एमटी क्षमता असलेले 50 ट्रेलर्स सुद्धा ऑर्डर केले होते. ही सर्व वाहनं आता दाखल झाली आहेत. त्यांना 8 फेब्रुवारी रोजी व्यावसायिक विक्री विभागाचे वरिष्ठ अध्यक्ष के. विजय वर्धन राव यांनी हिरवा झेंडा दाखवला.

माय होम ग्रुप मोठा खेळाडू

सिमेंटचा वेळेत आणि जलद पुरवठा करण्यासाठी या वाहनांची माय होम ग्रुपला मोठी मदत होणार आहे. यामुळे व्यवसाय वृद्धीला मोठी चालना मिळणार आहे. आता दोन राज्यांव्यतिरिक्त कंपनीचा परीघ देशपातळीवर वाढवण्यात येत आहे. राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या बांधकामात कंपनी हिरारीने सहभागी होत आहे. देशाच्या पायाभूत सुविधा विकासाच्या उपक्रमातही कंपनी सहभागी होणार आहे. कंपनीन सातत्याने प्रगतीपथावर पुढे जात आहे. नवनवीन कल्पना आधारे कंपनीची घोडदौड सुरू आहे. प्रत्येक दिवशी सुधारणा करत कंपनीची आगेकूच सुरू आहे. बाजारातील सर्वात मोठा खेळाडू होण्याचे कंपनीचे स्वप्न दृष्टीपथात आहे.

माय होम, बस्स नाम ही काफी है

माय होम ग्रुपचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. माय होम ग्रुप हा सिमेंट, रिअल इस्टेट, बांधकाम, ऊर्जा, मीडिया आणि शिक्षण या क्षेत्रात प्रभावी काम करत आहे. हा एक प्रभावशाली उद्योगसमूह आहे. या समूहाला तीन दशकांहून अधिकचा वैभवशाली वारसा मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि विविध क्षेत्रात या समूहाने आतापर्यंत 10 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून राष्ट्र सेवेत बहुमोल भूमिका बजावली आहे. उच्च उत्पादने, गुणवत्तापूर्ण सेवा, कॉर्पोरेट गव्हर्नमेंट, नैतिकता यासाठी हा समूह देशात ओळखल्या जातो. दूरदर्शी आणि कनवाळू डॉ. रामेश्वर राव जुपल्ली यांनी या समुहाची स्थापना केली आहे. माय होम इंडस्ट्रीज प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जे. रंजित राव यांच्या नेतृत्वाखाली या समुहाने मोठा पल्ला गाठला आहे आणि हा समूह वेगाने प्रगती साधत आहे.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.