IINA Awards 2025 : My Home ला मिळाला बेस्ट HSE आणि ESG पुरस्कार
माय होम कन्स्ट्रक्शनला IINA Awards 2025 मध्ये तीन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट HSE आणि बेस्ट ESG या श्रेणीत गोल्ड आणि प्लॅटिनम पुरस्कारांसह, ग्रावा बिजनेस पार्कलाही ग्रीन बिल्डिंगसाठी पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार कंपनीच्या पर्यावरणीय जबाबदारी आणि सस्टेनेबल विकासाच्या प्रतिबद्धतेचे प्रमाणपत्र आहेत. माय होमच्या सस्टेनेबिलिटी रोडमॅप आणि ग्रीन व्हिजनची माहितीही यावेळी सादर करण्यात आली.

माय होम कन्सट्र्क्शन प्रायव्हेट लिमिटेडला तीन मोठ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. IINA Awards 2025 अर्थात Infrastructure Development Academy International Awards 2025 सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी माय होम कन्सट्र्क्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 3 पुरस्कार मिळाले. त्यामध्ये बेस्ट HSE (Health, Safety & Environment) आणि बेस्ट ESG (Environment, Social, Governance) कॅटॅगरीमध्ये गोल्ड तसेच प्लॅटिनम अवॉर्डही मिळाला.
अवॉर्ड्स
My HOME च्या D.B.V.S.N. Raju, Head of HSE यांना Construction Safety Head या श्रेणीत गोल्ड पुरस्कार मिळाला.
तर ग्रावा बिजनेस पार्क (कोकापेट) (Grava Business Park -Kokapet) या प्रोजेक्टला ग्रीन बिल्डींग आणि सस्टेनेबिलिटी या कॅटॅगरीमध्येही गोल्ड अवॉर्ड मिळाला.
या खास प्रसंगी एस. वेणुगोपाल राव (Associate Vice President, Project & Sustainability) यांनी MY HOME च्या ग्रीन बिल्डिंग आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर प्रेझेंटेशन सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या प्रेझेंटेशनमध्ये सस्टेनेबिलिटी रोड मॅप, ग्रीन व्हिजन, स्जेटवाईज डेव्हलपमेंट प्लान , तसेच वार्षिक गोल प्लान याचीही सविस्तर माहिती देण्यात आली.
हे पुरस्कार म्हणजे MY HOME च्या टीमच्या मेहनतीचे फळ आहे. या पुरस्कारांमुळे माय होमच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली आहे. पर्यावरण आणि शाश्वत विकासासाठी(सस्टेनेबल डेव्हलपमेंट) यासाठी MY HOME ज्या पद्धतीने कार्य करत आहे, त्यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक प्रोत्साहन, प्रेरणा आहे. यासाठी ISDA चे खूप खूप आभार, अशी भावना हा पुरस्कार मिळाल्यानंतर कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आली.
