AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pension: मोठी बातमी! पेन्शन होणार दुप्पट? या लोकांना मोठा फायदा, ती अपडेट काय?

Atal Pension Yojana Big Update: केंद्र सरकार सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचाऱ्यांसोबतच असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना राबवते. मोदी सरकार आता या लोकांची पेन्शन योजना दुप्पट करण्याच्या तयारीत आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Pension: मोठी बातमी! पेन्शन होणार दुप्पट? या लोकांना मोठा फायदा, ती अपडेट काय?
अटल पेन्शन योजना Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 23, 2026 | 12:35 PM
Share

Atal Pension Yojana Big Update: केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचा परीघ वाढवण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. महागाई आणि निवृत्तीनंतरचा खर्च भागावा यासाठी सरकार मोठे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेतंर्गत (APY) देण्यात येणारी निवृत्ती, पेन्शन रक्कम वाढवण्यावर विचार करत आहे. किमान पेन्शनची मर्यादा वाढून ₹10,000 प्रति महिना करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. द मिंट ने याविषयीची वृत्त अधिकार्‍यांच्या माहिती आधारे दिले आहे.

असंघटित कामगारांना नोकरीची सुरक्षितता नसते. त्यांना एक निश्चित पगार नसतो. सामाजिक सुरक्षा जसे पीएफ, पेन्शन वा सुट्टीची सवलत मिळत नाही. देशातील एकूण कामगार वर्गात असंघटित कामगारांचे प्रमाणे जवळपास 90 टक्क्यांच्या घरात मानल्या जाते. यामध्ये घरगुती कामगार, मजूर, स्वयंरोजगार करणारे आणि इतर कामगारांचा समावेश आहे.

सरकारचे म्हणणे काय?

Atal Pension Scheme मे 2015 मध्ये सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील कामगारांना, शेतकरी, दुकानदार, छोट्या व्यावसायिकांना उतारवयात आर्थिक सहाय्य मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेतंर्गत 60 वर्षे वयानंतर 1,000 ते 5,000 रुपये प्रति महिना निश्चित निवृत्ती वेतन देणे हा उद्देश आहे. पण वाढती महागाई पाहता ही रक्कम आताच तोकडी वाटत आहे.

नवीन प्रस्ताव काय?

अर्थ मंत्रालय आणि पेन्शन फंड नियामक (PFRDA) मिळून एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पेन्शनची कमाल मर्यादा 8,000 ते 10,000 प्रति महिना करण्याची सूचना करण्यात आली आहे. या नवीन बदलामुळे योजना अधिक आकर्षक तर होईलच पण वाढत्या महागाईला तोंड देण्यास ही रक्कम मदत करेल असा दावा करण्यात येत आहे.

सध्या किती सदस्य?

अटल पेन्शन योजनेत आतापर्यंत 9 कोटींहून अधिक सदस्य आहेत. पण यातील अर्ध्याहून अधिक सदस्यांनी नियमित योगदान देणे बंद केले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक 1.35 कोटी नवीन सदस्य जोडल्या गेले आहेत. सरकारच्या मते कमाल निवृत्ती रक्कम मर्यादा वाढल्याने नवीन सदस्य जोडल्या जातील आणि जुने सदस्य ही योजना सोडणार नाही असे सरकारला वाटते.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?