NEFT सेवा उद्या 14 तास बंद राहणार, आर्थिक कामं आजच करुन घ्या, RBI नं दिली माहिती

NEFT ही सेवा उद्या 14 तास बंद राहणार असल्यानं व्यावसायिक आणि ग्राहकांनी आर्थिक काम आजचं करणं आवश्यक आहे. Reserve Bank of India NEFT

NEFT सेवा उद्या 14 तास बंद राहणार, आर्थिक कामं आजच करुन घ्या, RBI नं दिली माहिती
RBI

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सर्वाधिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. व्यावसायिक आणि बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) ट्विट करुन ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी (NEFT) सेवा उद्या म्हणजेच 23 मे रोजी 14 तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. एनईएफटीद्वारे द्वारे आपण भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकेच्या शाखेत न जाता पैसे पाठवू शकतो. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टीम (NEFT) संपूर्ण देशात वापरली जाते. या सेवेद्वारे पैसे पाठवण्यासाठी किमान किंवा कमाल मर्यादा नसते. (NEFT service on downtime tomorrow for 14 hours alert issued by Reserve Bank of India due to technical upgradation)

रिझर्व्ह बँकेचे ट्विट

RBI ने 17 मे रोजी त्यांच्या Twitter हँडलवरुन ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. 22 मे रोजी बँकांचं कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशन मुळे NEFT 23 मे रोजी 00:01 ते दुपारी 14:00 म्हणजेच (रात्रीच्या 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत) बंद राहिल. दुसरीकडे RTGS सेवा सुरु राहणार आहे.

NEFT सेवा नेमकी काय?

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टम ही अशी सुविधा आहे, जी तुम्हाला तुमच्या बँकेच्या मोबाईल अ‌ॅपवर वापरता येते. या सुविधेद्वारे काही मिनिंटांमध्ये पैसे पाठवले जातात. एनईएफटी ही सरळ आणि सोपी, सुरक्षित सुविधा आहे. ही सेवा वापरल्यानंतर ग्राहकांना ई-मेल आणि एसएमएस प्राप्त होतो. इंटरनेट बँकिगद्वारे ही सुविधा कधीही वापरता येते. एनईएफटीद्वारे दोन्ही व्यक्तींना एकाच ठिकाणी उपस्थित राहण्याची गरज नाही. या सुविधेद्वारे करण्यात आलेल्या व्यवहाराची माहिती पैसे पाठवणाऱ्याला आणि पैसे स्वीकारणाऱ्याला देखील मिळते.

NEFT द्वारे पैसे कसे ट्रान्सफर करायचे?

लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे तुमचं ऑनलाईन बैंकिंग अकाऊँट ओपन करा. NEFT Fund Transfer सेक्शनमध्ये जावा. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या डिटेल्स अ‌ॅड करा. त्यानंतर त्याचं नाव, बँक अकाऊँट नंबर आणि आयएफएससी कोड टाका. ज्याला पैसे पाठवणार आहोत त्याची माहिती जतन झाली की तुम्ही पैसे पाठवू शकता. तुम्हाला जितकी रक्कम पाठवायची आहे ती टाका आणि पैसे पाठवा. बँका NEFT शिवाय IMPS आणि RTGS सेवा देतात. या दोन्ही सेवा २३ मे रोजी सुरु राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

PF अकाऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार

बंद असलेल्या बँकेच्या खात्यांवरही मिळते व्याज, पैसे काढण्यासाठी असे सुरु करा अकाऊंट

(NEFT service on downtime tomorrow for 14 hours alert issued by Reserve Bank of India due to technical upgradation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI