क्रेडिट कार्डचा वापर करताना प्रामुख्याने कोणत्या चुका टाळायला हव्यात? क्रेडिट कार्डद्वारे 5 कामे अजिबात करू नका

क्रेडिट कार्डचा वापर करताना प्रामुख्याने कोणत्या चुका टाळायला हव्यात? क्रेडिट कार्डद्वारे 5 कामे अजिबात करू नका
Credit Card

Credit Card Tips : सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण क्रेडिट कार्ड वापरतो.अनेकांकडे वेगवेगळ्या बँकेचे क्रेडिट कार्ड पाहायला मिळते आणि सध्या बँक सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीमच्या आधारे क्रेडिट कार्ड विकत घेण्यास भाग पाडते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा क्रेडिट कार्ड हे एका प्रकारचे कर्ज आहे जे तुम्हाला भविष्यात चूकवायचे म्हणूनच क्रेडिट कार्डचा वापर करताना अतिशय सावधानता बाळगून करायला हवे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 16, 2022 | 5:41 PM

Credit Card Tips : सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण क्रेडिट कार्ड वापरतो.अनेकांकडे वेगवेगळ्या बँकेचे क्रेडिट कार्ड (Credit Card) पाहायला मिळते आणि सध्या बँक सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीमच्या आधारे क्रेडिट कार्ड विकत घेण्यास भाग पाडते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा क्रेडिट कार्ड हे एका प्रकारचे कर्ज आहे जे तुम्हाला भविष्यात चूकवायचे म्हणूनच क्रेडिट कार्डचा वापर करताना अतिशय सावधानता बाळगून करायला हवे म्हणूनच भविष्यात क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याला काही चुका (never do things) आवर्जून टाळायला हव्यात. आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत जे तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरताना अवश्य लक्षात ठेवायला पाहिजेत अन्यथा तुम्हाला भविष्यात अनेक आर्थिक संकटांना (financial loss) सामोरे जावे लागेल तसेच अशी काही कामे आहेत जी तुम्हाला क्रेडिट कार्डच्या मदतीने कधीच करायचे नाहीत.

एटीएम मधून कॅश काढणे

जर तुम्हाला असे वाटत असेल की क्रेडिट कार्ड द्वारे कॅश काढणे एक चांगली सुविधा ठरू शकते तर तसे करण्यापूर्वी तुम्हाला एक दोन वेळा विचार करायला हवा. जर तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारे एटीएम मधून पैसे काढत असेल तर त्याची परतफेडीसाठी तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही तसेच पैसे काढल्यानंतर लगेचच त्या पैशांवर व्याज आकारणे सुरू होऊन जाते. हे व्याज 2.5 ते 3.5 इतके टक्के दर महिना घेतले जाऊ शकते आणि म्हणूनच यावर तुम्हाला फ्लॅट ट्रांजेक्शन टॅक्स सुद्धा द्यावा लागेल.

इंटरनेशल ट्रांजेक्शन

जर तुम्ही बाहेर गावी गेला आणि अशावेळी क्रेडिट कार्ड्स जर वापर करत असाल तर यामुळे तुम्हाला फॉरेन करन्सी ट्रांजेक्शनची फी द्यावी लागेल. सोबतच एक्सचेंज रेट मधील जे काही चढ उतार आहेत याचा सुद्धा या सगळ्या गोष्टींवर परिणाम जाणवतो म्हणूनच जर तुम्हाला बाहेरगावी कॅश नाही वापरायची असेल तर अशावेळी क्रेडिट कार्ड एवजी प्रीपेड कार्डचा वापर करा.

क्रेडिट लिमिट

नेहमी क्रेडिट कार्ड वापर करतेवेळी आपल्या क्रेडिट कार्डची नेमकी मर्यादा काय आहे, त्याची लिमिट काय आहे हे आधी जाणून घ्या. जर तुम्ही लिमिट पेक्षा जास्त खर्च करत असाल तर अशा वेळी कंपनी खर्च केलेल्या पैशांवर अधिक व्याज सुद्धा लावू शकते त्याच बरोबर क्रेडिट कार्डचे जर 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वापर केला गेला तर आपल्या सिबील स्कोरवर सुद्धा वाईट परिणाम होतो.

मिनिमम ड्यू ऑप्शन

क्रेडिट कार्डच्या बिलामध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारचे ड्यू अमाउंट पाहायला मिळतात.
टोटल अमाउंट ड्यू आणि मिनिमम अमाउंट ड्यू. मिनिमम अमाउंट ड्यू मध्ये कमी पैसे फेडावे लागतात. जर तुम्ही या ऑप्शनचा विचार करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, या रकमेवर तुम्हाला जास्त प्रमाणात व्याज भरावे लागू शकते.हे व्याज पूर्ण रक्कमेवर लागतो आणि म्हणूनच पैसे परत करत असताना टोटल अमाउंट ड्यूचा पर्याय नेहमी निवडा.

बॅलन्स ट्रांसफर

जर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफरचा विचार करत असाल तर अशा वेळी या पर्यायाचा वापर विचार करूनच करा. बॅलन्स ट्रान्सफरचा अर्थ असा आहे की या कार्डच्या माध्यमातून आपण दुसऱ्या क्रेडिट कार्डच्या बिलाचा खर्च पूर्ण करत असतो असे केल्याने तुम्हाला काही प्रमाणात पैशांवर व्याज सुद्धा द्यावे लागेल म्हणून एका कार्डचे बिल दुसऱ्या कार्डने, दुसऱ्या कार्डच बिल तिसऱ्या कार्डने असे चुकून सुद्धा करू नका अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.असे केल्याने सुद्धा तुमचा सिबिल स्कोर वर विपरीत परिणाम शकतो.

संबंधित बातम्या :

टर्म इन्शुरन्ससाठी कंपनीला हवा ग्राहक ‘धाडधाकट’! कोरोना बाधितांना मुदत विमा घेण्यात अटींचा डोंगर, विमा कंपन्यांची रडकथा…

LIC प्लॅन | महिलांच्या स्वाबलंबनाची ‘आधारशीला’: 29 रुपयांची बचत, 3 लाखांची मॅच्युरिटी!

LIC IPO : या आर्थिक वर्षातच एलआयसीचा आयपीओ, युद्धपातळीवर सर्व प्रकारच्या प्रक्रिया सुरू


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें