AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 ऑगस्टपासून UPI चे ‘हे’ नवीन नियम होणार लागू, GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांना दिसतील ‘हे’ बदल

1 ऑगस्ट 2025 पासून UPI चे नवीन नियम लागू होतील. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर तुम्हाला या बदलांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. चला तर मग कोणते नवीन नियम लागू केले आहेत याबद्दल जाणून घेऊयात...

1 ऑगस्टपासून UPI चे 'हे' नवीन नियम होणार लागू, GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांना दिसतील 'हे' बदल
1 ऑगस्टपासून UPI चे 'हे' नवीन नियम होणार लागू, GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांना दिसतील 'हे' बदल
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 10:06 PM
Share

1 ऑगस्ट 2025 पासून UPI शी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. UPI सिस्टमचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत जेणेकरून सिस्टमवरील दबाव कमी होईल. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. तर या नवीन नियमानुसार पेमेंट फेल होणे किंवा विलंब यासारख्या समस्या कमी होतील. या बदलांचा महत्त्वाच्या ट्रान्जेक्शनवर परिणाम होणार नाही, परंतु बॅलन्स चेक, स्टेटस रिफ्रेश सारख्या गोष्टींवर निश्चितच मर्यादा लादल्या जात आहेत. NPCI यांच्या नुसार या मर्यादामुळे UPI अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होईल, विशेषतः जेव्हा जास्त लोक एकाच वेळी व्यवहार करतात.

1 ऑगस्टपासून UPI वर कोणत्या नवीन मर्यादा लागू केल्या जातील?

  • पुढील महिन्यापासून, UPI वापरकर्ते त्यांचा अंकाऊट बॅलेंस फक्त 50 वेळा चेक करू शकतील.
  • याशिवाय जे वापरकर्ते त्यांच्या मोबाईल नंबरशी जोडलेले त्यांचे बँक अँकाऊट वारंवार तपासतात ते आता फक्त 25 वेळाच चेक करू शकतील.
  • सिस्टमवर अनावश्यक भार पडू नये. तसेच अनेकदा ट्रान्जेक्शन करताना स्पीड स्लो होणे किंवा ट्रांजॅक्शन फेल होणे या समस्या अधिक निर्माण होऊ नये, याकरिता या मर्यादा सुरू करण्यात आल्या आहेत.

Autopay वरही काही परिणाम होईल का?

  • नवीन नियमानुसार आता ऑटोपे वरही परिणाम होणार आहे. NPCI आता UPI ऑटोपे ट्रान्जेक्शनसाठी निश्चित वेळेचे स्लॉट सादर करत आहे.
  • याचा अर्थ असा की सबस्क्रिप्शन, EMI, वीज बिल आणि पाण्याचे बिल यासारखे शेड्यूल केलेले पेमेंट आता दिवसभर कधीही करता येणार नाहीत.
  • हे पेमेंट ट्रान्जेक्शन करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवण्यात येणार आहे. या निश्चित वेळी तुम्हाला पेमेंट करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. हा निश्चितच एक तांत्रिक बदल आहे, परंतु यामुळे सिस्टमवरील ताण कमी होईल आणि वेग सुधारेल.

प्रत्येक UPI वापरकर्त्यावर परिणाम होईल का?

थोडक्यात सांगायचे झाले तर हो. तुम्ही दिवसातून एकदा UPI वापरत असलात किंवा 20 वेळा, या मर्यादा सर्वांना लागू होतील. अशातच तुम्ही वारंवार बॅलन्स किंवा स्टेटस तपासले नाही, तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. हे बदल प्रत्यक्षात मोठे ट्रान्जेक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन केले गेले आहेत. कारण यामुळे नकळतपणे सिस्टमवर जास्त भार पडतो.

ट्रान्जेक्शनची मर्यादा बदलली आहे का?

नाही. पेमेंट मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहतील – बहुतेक प्रकरणांमध्ये प्रति व्यवहार 1 लाख रुपयांपर्यंत आणि आरोग्यसेवा किंवा शिक्षण यासारख्या काही श्रेणींमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत ट्रान्जेक्शन करता येणार आहे. 1 ऑगस्टच्या अपडेटसह या मर्यादा बदलणार नाहीत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

वापरकर्त्यांना काही करावे लागेल का?

वापरकर्त्यांना काहीही करण्याची गरज नाही. हे नवीन नियम तुमच्या UPI अॅप्सद्वारे आपोआप लागू केले जातील. फक्त मर्यादांवर लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला दिवसा व्यवहार ब्लॉक करण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

व्यापारी आणि बिलर्सवर परिणाम होईल का?

आता ऑटोपे व्यवहार निश्चित वेळेच्या स्लॉटमध्ये होतील, त्यामुळे UPI द्वारे ऑटोमॅटिक कलेक्शन करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या वेळेचे पालन करावे लागेल. परंतु बहुतेक वापरकर्त्यांसाठी – मग ते मोबाइल रिचार्ज असो किंवा नेटफ्लिक्ससारखे सबस्क्रिप्शन असो – सर्वकाही पूर्वीसारखेच चालू राहील.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.