रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, वडापाव ते मसाला डोसा; मनपसंत डिश थेट सीटवर

सर्व भारतभरातील रेल्वे स्थानकांवरील पुरवठा साखळीमुळं रेलरेस्ट्रोचं मागणी दिवसागणिक वाढत आहे. यूनिवार्ताच्या वृत्तानुसार, रेलरेस्ट्रो यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत 50 ते 60 रेल्वे स्थानकांवर सुविधा उपलब्ध करणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, वडापाव ते मसाला डोसा; मनपसंत डिश थेट सीटवर
मनपसंत डीश मिळणार सीटवरImage Credit source: railrestro
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 7:46 PM

नवी दिल्लीभारताची लाईफलाईन म्हणून भारतीय रेल्वेची (Indian Railways) ओळख आहे. काश्मीर ते कन्याकुमारी विस्तार असेलल्या भारतीय रेल्वेत कोट्यावधी नागरिक (Rail Passengers) रेल्वेनं प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात रेल्वेत खाण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. एक दिवसांपेक्षा अधिकच्या प्रवासात रेल्वेत बनविलेल्या ताजे अन्न खाण्याकडं प्रवाशांचा कल असतो. आता प्रवाशांना केवळ रेल्वेतीलच नव्हे तर रेल्वे स्थानकावरुन पदार्थांची ऑर्डर मागविता येणार आहे. खवय्या प्रवाशांसाठी ‘रेल रेस्ट्रॉ’च्या सेवेचा लवकरच विस्तार होणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग (Railway route) जात असलेल्या राज्यांतून पदार्थांची चव चाखता येणार आहे. रेल्वे मार्ग महाराष्ट्रातून जाणार असल्यास वडापाव, पंजाबमधून आलू-पराठा, गुजरातचा ढोकळा, दिल्लीचे छोले-कूलचे, आंध्रात मसाला डोसे या पदार्थांवर ताव मारता येणार आहे. कोविड प्रकोपामुळं निर्बंधामुळं मर्यादित असलेली ‘रेल रेस्ट्रॉ’ची सेवा सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहे.

‘रेल रेस्ट्रो’ : तमिळनाडू ते गुजरात

इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRTC) ही भारतीय रेल्वेची एक उप-कंपनी आहे. आयआरटीसीच्या अंतर्गत ‘रेलरेस्ट्रॉ’चं संचलन केले जाते. रेलेरेस्ट्रॉचे भारतभर जाळे आहेत. सर्व भारतभरातील रेल्वे स्थानकांवरील पुरवठा साखळीमुळं रेलरेस्ट्रॉचं मागणी दिवसागणिक वाढत आहे. यूनिवार्ताच्या वृत्तानुसार, रेलरेस्ट्रो यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत 50 ते 60 रेल्वे स्थानकांवर सुविधा उपलब्ध करणार आहे.

‘या’ रेल्वे स्थानकांवर फूड डिलिव्हरी:

रेलरेस्ट्रोने शुक्रवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. देशभरातील नेटवर्कचा विस्तार करण्याचं कंपनीचं धोरण असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. आगामी काळात कंपनी नेटवर्क क्षमता दुप्पट करणार आहे. सध्या कंपनीद्वारे नागपूर (महाराष्ट्र), विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश), इटारसी (मध्य प्रदेश), दीन दयाल उपाध्याय (उत्तर प्रदेश), तिरुपती (आंध्र प्रदेश), गुवाहाटी (आसाम), कोटा (राजस्थान), लखनऊ (उत्तर प्रदेश), कानपुर (उत्तर प्रदेश) आदी स्थानकांवर स्वादिष्ट आणि रुचकर अन्नाची डिलिव्हरी केली जाते. सर्वाधिक वर्दळीचं स्थानक ओळखली जातात. ‘रेलरेस्ट्रो’ पुढील टप्प्यात पुणे (महाराष्ट्र), भुवनेश्वर (ओडिशा), आसनसोल (पश्चिम बंगाल), जयपुर (राजस्थान), हावडा (पश्चिम बंगाल), गोरखपूर (उत्तर प्रदेश), रायपुर (छत्तीसगड) सहित अन्य प्रमुख रेल्वे स्थानकांवर फूड डिलिव्हरी करणार आहे.

मार्केट ट्रॅकर: घसरणीचे सलग 3 आठवडे, रशिया-यूक्रेन वादाचा परिणाम; 10.5 लाख कोटी बुडाले

एलआयसी आयपीओत ‘फॉरेन’ एन्ट्री; 20 टक्के एफडीआयला मान्यता, केंद्राची मोहोर

रशिया, युक्रेन युद्धाचा वाहन उद्योगाला फटका; वाहानाच्या किंमती वाढणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.