एलआयसी आयपीओत ‘फॉरेन’ एन्ट्री; 20 टक्के एफडीआयला मान्यता, केंद्राची मोहोर

केंद्रीय मंत्रिमंडळानं FDI धोरणांत महत्वाचे बदल केले आहेत. नव्या बदलानुसार एलआयसीच्या आयपीओत ऑटोमॅटिक रुटद्वारे 20 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे.

एलआयसी आयपीओत ‘फॉरेन’ एन्ट्री; 20 टक्के एफडीआयला मान्यता, केंद्राची मोहोर
भारतीय आयुर्विमा महामंडळ
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 4:55 PM

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अर्थात एलआयसी (LIC) बहुप्रतीक्षित आयपीओ बाबत महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने आयपीओत थेट परकीय गुंतवणुकीला (Foreign Investors) मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं FDI धोरणांत महत्वाचे बदल केले आहेत. नव्या बदलानुसार एलआयसीच्या आयपीओत ऑटोमॅटिक रुटद्वारे 20 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला (Foreign Direct Investment) मान्यता देण्यात आली आहे. आगामी काही दिवसांत एलआयसीचा आयपीओ बाजारात डेरेदाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. DPIIT द्वारे थेट परकीय गुंतवणूक संबंधित नवीन नियमांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं निर्णयावर मोहोर उमटवली आहे.

कायद्यात बदल, केंद्राची मोहोर

सध्या इन्श्युरन्स सेक्टरमध्ये ऑटोमॅटिक रुटच्या माध्यमातून 74 टक्के FDI साठी मान्यता मिळाली आहे. मात्र, एलआयसीसाठी नियम लागू होत नाही. आयुर्विमा महामंडळाच्या कामकाजाचं नियमन एलआयसीच्या कायद्यांद्वारे केलं जातं. सेबीच्या नियमानुसार, एफपीआय (परकीय पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) आणि एफडीआय (थेट परकीय गुंतवणूक) दोघांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, एलआयसी कायद्यांमध्ये परकीय गुंतवणुकदारांसाठी कोणताही नियम नाही. त्यामुळे परकीय गुंतवणुकदारांचा समावेश करण्यासाठी एलआयसीच्या कायद्यांत बदल अपेक्षित होते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर सर्व प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पॉलिसीधारकांना 5 टक्के सवलत

एलआयसीच्या बहुप्रतीक्षित आयपीओत पॉलिसीधारकांना विशेष सवलत दिली जाणार आहे. आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 5 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. इश्य प्राईसवर एलआयसी मार्केट कॅपमध्ये देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये सहज समाविष्ट होऊ शकेल. लिस्टिंगनंतर एलआयसीची कामगिरी दमदार राहिली तर विमा कंपनीची दादागिरी आयपीओ आणि शेअर बाजारात ही चालेल. कंपनी आयआयएल आणि टीसीएलही मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

‘पॅन’ अपडेट महत्वाचं

एलआयसी पॉलिसीधारकांना वेळेपूर्वीच काही कागदपत्रांची पूर्तता करणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. तुमच्याकडे एलआयसीची एक किंवा दोन पॉलिसी असल्यास आणि तुम्हाला पॉलिसी कोट्यातून आयपीओ खरेदीसाठी पॅन (PAN Update) अपडेट करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच डि-मॅट खातं  (D-MAT ACCOUNT) असणं बंधनकारक आहे. दोन्ही अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती एलआयसी शेअरची खरेदी निश्चितच करू शकतील. एलआयसीच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीअखेर पॅन अपडेट करण्याची मुदत असेल.

संबंधित बातम्या

रशिया, युक्रेन युद्धाचा वाहन उद्योगाला फटका; वाहानाच्या किंमती वाढणार?

क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी; जाणून घ्या प्रमुख क्रिप्टो करन्सीचे आजचे भाव

विधानसभा निवडणूक होताचा इंधन दरवाढीचा झटका; मार्चमध्ये पेट्रोल 8 रुपयांनी महागणार?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.