AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी; जाणून घ्या प्रमुख क्रिप्टो करन्सीचे आजचे भाव

गेल्या 24 तासांमध्ये जागतिक क्रिप्टो करन्सीच्या (Cryptocurrency) मार्केट कॅपमध्ये तब्बल 4.01 टक्क्यांची वाढ झाली आहे. 4.01 टक्क्यांच्या वाढीसह क्रिप्टो करन्सीचे मार्केट 1.80 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.

क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी; जाणून घ्या प्रमुख क्रिप्टो करन्सीचे आजचे भाव
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 2:05 PM
Share

नवी दिल्ली: गेल्या 24 तासांमध्ये जागतिक क्रिप्टो करन्सीच्या (Cryptocurrency) मार्केट कॅपमध्ये तब्बल 4.01 टक्क्यांची वाढ झाली आहे. 4.01 टक्क्यांच्या वाढीसह क्रिप्टो करन्सीचे मार्केट 1.80 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. लोकप्रिय क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉईनच्या (Bitcoin) किमतीमध्ये मात्र 0.70 टक्क्याची घसरण झाली आहे. बिटकॉईनमध्ये जरी घसरण झाली असली तरी देखील बिटकॉईन ही जगातील सर्वात महागडी क्रिप्टो करन्सी ठरली आहे. बिटकॉईनची किंमत सध्या 39,588.15 डॉलर प्रती बिटकॉईन इतकी आहे. बिटकॉईन प्रमाणेच इतर क्रिप्टो करन्सी कार्डानो, पोलका डॉट (Polka dot), सोलाना यांच्या किमतींमध्ये देखील तेजी दिसून येत आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. कच्च्या तेलापासून ते सोन्यापर्यंत सर्वच वस्तू महागल्या आहेत. क्रिप्टो करन्सीच्या मार्केटमध्ये देखील तेजी दिसून येत आहे.

प्रमुख क्रिप्टो करन्सीचे दर

बिटकॉईनचा दर सर्वाधिक म्हणजे 39,588.15 डॉलर प्रति बिटकॉईन आहेत. कार्डानोच्या दरात 7.36 टक्क्यांची वाढ झाली असून, कार्डानोचे दर 72.35 डॉलर प्रति कार्डानोवर पोहोचले आहेत. क्रिप्टो करन्सी पोलका डॉटच्या दरामध्ये देखील तेजी दिसून येत आहे. पोलका डॉटचे दर 10.75 टक्क्यांनी वधारले असून, पोलका डॉटचा भाव 1,413.76 प्रती पोलका डॉटवर पोहचला आहे. सालानाच्या किमतीमध्ये देखील 3.57 टक्क्यांची वाढ झाली असून, त्याची किंमत 7,304.01 डॉलर प्रती सालानावर पोहचली आहे. दरम्यान पुढील काळात क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतात अद्यापही गोंधळ कायम

भारतामध्ये मात्र सध्या क्रिप्टो करन्सीबाबत सभ्रम कायम आहे. क्रिप्टोला अद्यापही अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे भारतात क्रिप्टोला अधिकृत दर्ज कधी मिळतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. क्रिप्टो मार्केट हे अनिश्चिततेसाठी ओळखले जाते. क्रिप्टो मार्कोटच्या किमतीमध्ये तीव्र चढ उतार पहायला मिळतो. कधी अचानक किमती कमी होतात त्यामुळे गुंतवणूकदारांना लाखोंचा फटका बसतो, तर कधी अचानक किमती वाढतात त्यामुळे गुतवणूकदारांचा कोट्यावधीचा फायदा देखील होतो. त्यामुळे क्रिप्टो मधील गुंतवणूक रिस्की मानली जाते.

संबंधित बातम्या

विधानसभा निवडणूक होताचा इंधन दरवाढीचा झटका; मार्चमध्ये पेट्रोल 8 रुपयांनी महागणार?

कच्च्या तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा पेट्रोल, डिझेलचा भाव

Russia-Ukraine war, बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट; महागाई भडकण्याची शक्यता

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.