AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीता अंबानी यांनी दुकानात बसून घेतला आलू टिक्कीचा स्वाद, बाबा विश्वनाथला मुलाच्या लग्नाची दिली पत्रिका

Neeta Ambani at Chat Shop: नीता अंबानी यांच्यासोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा होते. माध्यमांशी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, मी 10 वर्षांनी वाराणसीत आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरची भव्यता पाहून खूप आनंद झाला. काशी पूर्णपणे बदलली आहे.

नीता अंबानी यांनी दुकानात बसून घेतला आलू टिक्कीचा स्वाद, बाबा विश्वनाथला मुलाच्या लग्नाची दिली पत्रिका
nita ambain
Updated on: Jun 25, 2024 | 8:40 AM
Share

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी वाराणसीत पोहचल्या. त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी त्या काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या. पूजा-पाठ केले. भगवान शिव यांना लग्नाची पत्रिका अर्पण केली. त्यानंतर नीता अंबानी यांची पाऊले वाराणसीमधील प्रसिद्ध चाटच्या दुकानाकडे वळली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन टमाटर चाट आणि आलू टिक्कीचा स्वाद घेतला.

काशी चाट भंडारमध्ये घेतला स्वाद

मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि सून राधिका यांचे लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी नीता अंबानी बाबा विश्वानाथ यांच्या दरबारात आल्या. त्यांनी काशी विश्वनाथ आणि गंगा मातेचे आशीर्वाद घेतले. गंगा आरतीमध्ये सहभागी घेतला. काशी विश्वनाथ धाम येथे दर्शन आणि पूजा केल्यानंतर त्या काशी चाट भंडारला पोहोचल्या.

neeta ambain

काशी पूर्णपणे बदलले

नीता अंबानी यांच्यासोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा होते. माध्यमांशी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, मी 10 वर्षांनी वाराणसीत आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरची भव्यता पाहून खूप आनंद झाला. काशी पूर्णपणे बदलली आहे.

neeta ambain

लग्नचा सोहळा 12 जुलैपासून

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचा मुख्य सोहळा शुक्रवारी 12 जुलैपासून सुरु होणार आहे. लग्नासाठी येणार्या पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पोशाख घालून येण्यास सांगण्यात आले आहे. रविवारी 14 जुलै रोजी लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. राधिका मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे.

प्री वेडींग समारंभाला होते दिग्गज

अनंत आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीचा सोहळा या वर्षाच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरमध्ये झाला होता. या सोहळ्यास जगभरातील दिग्गज आले होते. बिल गेट्सपासून एलन मस्कसारखे उद्योगपतींनी त्या प्री वेडींग समारंभाला हजेरी लावली होती. तसेच हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजर होत्या. तसेच दुसरे प्री-वेडिंग समारंभ 29 मई से 1 जून दरम्यान क्रूजवर आयोजिच केले होते.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.