आता LIC चा IPO पुढील आर्थिक वर्षात येणार, अर्थ सचिवांची मोठी माहिती

टीव्ही सोमनाथन म्हणाले की, एअर इंडियाची निर्गुंतवणूक लवकरच होईल. ती आता प्रगत टप्प्यावर पोहोचलीय. एलआयसीची निर्गुंतवणूक निश्चित आहे, यासाठीची मुदत पुढील वर्षी मार्च ते जूनदरम्यान असेल. या आर्थिक वर्षात बीपीसीएलची निर्गुंतवणूक शक्य आहे.

आता LIC चा IPO पुढील आर्थिक वर्षात येणार, अर्थ सचिवांची मोठी माहिती
LIC IPO
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 12:32 PM

नवी दिल्लीः लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी आयपीओचे निर्गुंतवणूक या आर्थिक वर्षात शक्य होणार नाही, अशी माहिती वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी दिली. पुढील वर्षी मार्च ते जूनदरम्यान एलआयसीची निर्गुंतवणूक शक्य आहे, असे ते म्हणाले. या व्यतिरिक्त एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या निर्गुंतवणुकीसंदर्भात ते म्हणाले की, ते या आर्थिक वर्षात पूर्ण झाले पाहिजे.

टीव्ही सोमनाथन म्हणाले की, एअर इंडियाची निर्गुंतवणूक लवकरच होईल. ती आता प्रगत टप्प्यावर पोहोचलीय. एलआयसीची निर्गुंतवणूक निश्चित आहे, यासाठीची मुदत पुढील वर्षी मार्च ते जूनदरम्यान असेल. या आर्थिक वर्षात बीपीसीएलची निर्गुंतवणूक शक्य आहे. ते म्हणाले की, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CONCOR) चे निर्गुंतवणूक या आर्थिक वर्षात शक्य नाही. हे पुढील आर्थिक वर्षात होणार आहे.

करात कपात नाही

कर कपातीच्या मुद्द्यावर टीव्ही सोमनाथन म्हणाले की, करदात्यांना कर कपातीसारखा कोणताही दिलासा मिळेल, असे मला वाटत नाही. कर कपातीबद्दल प्रत्येकाला बोलायचे आहे, परंतु या महामारीमध्ये सरकारने किती खर्च केला, याबद्दल बोलले जात नाही.

सरकारी पैसा असाच खर्च केला गेला

सरकारने अन्न अनुदान म्हणून सुमारे 1 लाख कोटी खर्च केलेत. 20 हजार कोटी रुपये खत अनुदान म्हणून खर्च करण्यात आलेत. आपत्कालीन आरोग्य प्रतिसादावर 15 हजार कोटी खर्च करण्यात आलेत. याशिवाय राज्यांना 56 हजार कोटींचा निधी जारी करण्यात आलाय. याशिवाय 2 लाख कोटींच्या खर्चाची ब्लू प्रिंट आधीच तयार करण्यात आली. अशा परिस्थितीत सरकारला कर दरामध्ये दिलासा देणे कठीण जात आहे.

सिरिल अमरचंद मंगलदास यांची कायदेशीर सल्लागार म्हणून निवड

सरकारने एलआयसी आयपीओसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास यांची निवड केली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. चार कायदे कंपन्य क्रॉफर्ड बेले, सिरिल अमरचंद मंगलदास, लिंक लीगल आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनी यांनी 24 सप्टेंबर रोजी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे (डीआयपीएएम) सादरीकरण केले.

आर्थिक बोली उघडण्यापूर्वी तांत्रिक बोलींचे विश्लेषण

दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी सांगितले की, एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि आर्थिक बोली उघडण्यापूर्वी तांत्रिक बोलींचे विश्लेषण केले जात आहे. मात्र, त्यांनी कर्जबाजारी झालेल्या सरकारी विमान कंपनीसाठी किती निविदा प्राप्त झाल्या याची माहिती देण्यास नकार दिला. नागरी उड्डयन मंत्री म्हणाले, “आम्हाला तांत्रिक बोली आणि आर्थिक बोली प्राप्त झाल्यात, ज्या सीलबंद कव्हरमध्ये आहेत. सध्या तांत्रिक बोलींचा आढावा घेतला जात आहे, त्यानंतरच आर्थिक निविदा उघडल्या जातील.

संबंधित बातम्या

विश्वास अन् नफ्याच्या बाबतीत रतन टाटा मुकेश अंबानींच्या पुढे, टाटा समूहाकडून सर्वाधिक परतावा

चांगली बातमी! रांग न लावता मोबाईल अॅपमधून सहज हिंदीत रेल्वे तिकिटे बुक करता येणार, जाणून घ्या

Now LIC’s IPO will come in the next financial year, the finance secretary said

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.