AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता फोनवरुन एका स्कॅनने कॅश काढता येणार, एटीएमची गरजच नाही, एनपीसीआयची मोठी तयारी

आता स्मार्टफोनने कॅश काढणे आणखी सोपे होणार आहे. सध्या युपीआयने पैसे पाठवणे, बिल भरणे आणि ऑनलाईन खरेदी केली जात आहे.परंतू आता लवकरच युपीआयने कॅश काढता येणार आहे.

आता फोनवरुन एका स्कॅनने कॅश काढता येणार, एटीएमची गरजच नाही, एनपीसीआयची मोठी तयारी
| Updated on: Sep 15, 2025 | 4:07 PM
Share

आता युपीआय कॅश काढण्यासाठी देखील वापरता येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI ) आता क्युआर कोड स्कॅन करताच कॅश काढण्याची सुविधा सुरु करण्याची तयारी करीत आहे. यासाठी लाखो बिझनस करस्पॉन्डट्स ( BCs ) उदा. किराणा दुकानदार वा छोटे सर्व्हीस पॉईंटवर क्यूआर कोड उपलब्ध असतील. आणि ग्राहक आपल्या मोबाईलवरील कोणत्याही युपीआय ऐपने कोड स्कॅन करुन रोख रक्कम काढू शकणार आहेत.

काय आहेत डिटेल्स

इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या नव्या सुविधेसाठी ( देशात रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टीम चालवणारी संस्था ) आरबीआयची मंजूरी मागितली आहे. युपीआयद्वारे रोकड काढण्याची बिझनस करस्पॉन्डट्स ( BCs ) वर देखील मिळावी यासाठी ही मंजूरी मागितली आहे. बातमीनुसार NPCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की ही योजना अद्याप प्राथमिक अवस्थेत असून त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

सध्या युपीआयवरुन कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा केवळ युपीआय सुविधेने सुसज्ज असलेल्या एटीएमवरच आहे किंवा निवडक दुकानदारांकडे ही सुविधा आहे.ही सुविधा मर्यादित रकमेसाठी आहे. उदा. शहरे आणि निमशहरा केवळ एका ट्राक्झंशनवर केवळ १००० रुपये रोखीने काढता येतात. ग्रामीण भागात ही मर्यादा २००० रुपयांपर्यंत आहे. आता योजनेनुसार ही सुविधा संपूर्ण देशातील २० लाखांहून बिझनस बिझनस करस्पॉन्डट्स (BCs)पर्यंत पसरवली जाणार आहे.

BCs कोण आहेत ?

हे छोटे – छोटे केंद्र वा लोक आहेत जे दुर्गम वा बँकींग सुविधा नसलेल्या भागात असतात आणि बँके शाखेचे एक्सटेंशन म्हणून काम करतात. म्हणजे हे लोकांना बँकींग आणि वित्तीय सेवा पोहचवण्यास मदत करतात. NPCI ने साल २०१६ मध्ये युपीआय तयार केले आणि लाँच केले होते.

कसे करेल काम –

सहकार आणि बँकींग सेक्टर युपीआयने रोख रक्कम काढण्याच्या सुविधेवर काम करत आहेत. जेव्हा कोणताही ग्राहक BC आऊटलेटवर जाईल तेव्हा तो युपीआयने क्यूआर कोड स्कॅन करेल.

ग्राहकाला जेवढी रोकड हवी तेवढी रक्कम त्याच्या खात्यातून डेबिट होईल

तेवढीच रक्कम नंतर BC च्या खात्यांवर क्रेडिट होईल

त्यानंतर BC ग्राहकांना कॅश रक्कम देईल.

सध्या काय पर्याय आहे –

सध्या ग्राहक BCs जवळी मायक्रो -ATM मशीनद्वारे एटीएम कार्ड टाकून पैसे काढू शकतात. परंतू हा पर्याय खूपच कमी वापरला जात आहे.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.