AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rule Change 1st October : LPG, UPI ते रेल्वे तिकीट बुकिंग… आजपासून हे 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम ?

Rule Change From Today : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनतच, म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून देशभरात मोठे बदल लागू होऊ शकतात. सर्वसामन्य जनतेवर याचा मोठा परिणाम होणार असून लोकांच्या खिशाला कात्री लागू शकते.

Rule Change 1st October : LPG, UPI ते रेल्वे तिकीट बुकिंग... आजपासून हे 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम ?
आजपासून होणार 5 मोठे बदलImage Credit source: social media
| Updated on: Oct 01, 2025 | 9:20 AM
Share

वर्षाचा नववा महिना अर्थात सप्टेंबर संपला असून आजपासून 10 वा महिना ऑक्टोबर सुरू झाला आहे. या नवीन महिन्याच्या सुरुवातीसह, अनेक मोठे बदल (Rule Change From 1 October) लागू झाले आहेत, जे पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होत आहेत. यामध्ये, तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवून ग्राहकांना धक्का दिला आहे, तर दुसरीकडे, UPI शी संबंधित नियम देखील बदलले आहेत. या बदलांमुळे प्रत्येक घरावर आणि प्रत्येकाच्या खिशावर परिणाम होणार आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

बदलांसह ऑक्टोबरची सुरूवात

प्रत्येक महिन्याची सुरुवात अनेक लहान-मोठ्या बदलांनी होते, ज्यात आर्थिक बदलांचाही समावेश असतो. ऑक्टोबरची सुरुवातही अशीच झाली आहे आणि 1 ऑक्टोबरपासून, सामान्य माणसासाठी UPI ते भारतीय रेल्वे प्रवासापर्यंत, अनेक गोष्टी बदलल्या आहेत. सणासुदीच्या काळात एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे, तर भारतीय रेल्वेने ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगचे नियमही बदलले आहेत, ज्याचा परिणाम रेल्वे प्रवाशांवर होणार आहे.

पहिला बदल : LPG सिलेंडर महागला

1 ऑक्टोबरपासून होणाऱ्या बदलांमध्ये, सर्वात महत्वाचा बदल म्हणजे गॅसची किंमत, लोकांचे सर्वात जास्त लक्ष एलपीजी सिलिंडरच्या किमतीतील बदलावर आहे, कारण ते थेट स्वयंपाकघराच्या बजेटशी संबंधित आहे. गेल्या काही महिन्यांत ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या, परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी त्यात वाढ करण्यात आली आहे आणि दिल्ली ते मुंबईपर्यंत ते महाग झाले आहेत.

IOCLच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली आहे आणि आता ती 1580 ऐवजी 1595 ५ रुपये होईल. कोलकातामध्ये ही किंमत 1684 वरून 1700 रुपये झाली आहे. मुंबईत, 19 किलोच्या सिलिंडरची किंमत, 1531 रुपये होती, आता ती 1547 रुपये झाली आहे, तर चेन्नईमध्ये किंमत 1738 रुपयांवरून ते दर 1754 झाल आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत कायम ठेवण्यात आली आहे.

दुसरा बदल : हवाई प्रवास अर्थात विमान प्रवास महागणार

ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी झालेला दुसरा बदल हा हवाई प्रवाशांशी संबंधित आहे, कारण सप्टेंबर महिन्यात विमान इंधनात कपात केल्यानंतर, आता सणासुदीच्या काळात, कंपन्यांनी एटीएफच्या किमतीत ( ATF Price) मोठी वाढ केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासूनच्या नवीन दरांवर नजर टाकली तर, दिल्लीत त्याची किंमत प्रति किलोलिटर 90, 713.52 रुपयांवरून 93.766.02 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.

कलकत्ता येथे कोलकातामध्ये 93,886.18 रुपयांऐवजी 96,816.58 रुपये प्रति किलोलिटर झाले आहे, मुंबईत 84,832.83 रुपयांऐवजी 87,714.39 रुपये प्रति किलोलिटर झाले आहे आणि चेन्नईमध्ये ते 94,151.96 रुपयांवरून 97,302.14 रुपये झाले आहे. हवाई टर्बाइन इंधनाच्या किमती वाढल्याने विमान कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च वाढेल, ज्यामुळे ते विमान तिकिटांच्या किमती वाढवू शकतात.

तिसरा बदल : ऑनलाइन तिकिटे कोणत्या प्रवाशांना उपलब्ध ?

तिसरा बदल रेल्वे प्रवाशांसाठीलागू होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये फसवणूक रोखण्यासाठी, भारतीय रेल्वेने 1 ऑक्टोबर 2025 पासून नियमांमध्ये बदल जाहीर केले, जे आजपासून लागू होऊ शकतात. याअंतर्गत, ज्यांनी आधीच आधार व्हेरिफिकेशन केले आहे तेच आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतील. हा नियम आयआरसीटीसी वेबसाइट आणि ॲप दोन्हीवर लागू होईल. हासध्या, हा नियम तत्काळ बुकिंगसाठी लागू आहे. तथापि, संगणकीकृत PRS काउंटरवरून तिकिटे खरेदी करणाऱ्यांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

चौथा बदल : UPI शी संबंधित बदल

ऑक्टोबरची सुरुवात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस किंवा UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण बदलांसह होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 29 जुलै रोजीच्या एका सर्क्युलरमध्ये माहिती शेअर केली होती की ते सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या UPI फीचर्सपैकी एक असलेले, पीअर टू पीअर (P2P) कलेक्ट ट्रान्झॅक्शन काढून टाकणार आहे आणि हे 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू केले जाईल. यूजर्सची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी एक पाऊल म्हणून हे वैशिष्ट्य UPI ॲप्समधून काढून टाकले जात आहे.

पाचवा बदल : बँकांना बऱ्याच सुट्ट्या

यंदा ऑक्टोबर महिना हा सणांनी भरलेला असून, अशा परिस्थितीत, जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने जारी केलेली ऑक्टोबर बँक हॉलिडे लिस्ट तपासा. अन्यथा तुम्ही बँकेत पोहोचाल पण ती बँक बंद असू शकते.

खरंतर या महिन्याची सुरुवात दुर्गापूजेच्या सुट्टीने होईल आणि त्यानंतर संपूर्ण महिन्यात महात्मा गांधी जयंती, दसरा, लक्ष्मीपूजा, महर्षी वाल्मिकी जयंती, करवा चौथ, दिवाळी, गोवर्धन पूजा, भाईदूज आणि छठ पूजा अशा एकूण 21 सुट्या असतील. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा तसेच रविवारचा साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. मात्र, बँकेच्या या सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार आणि शहरानुसार बदलू शकतात.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.