3 बीएचकेच्या फ्लॅटचे एक लाख रुपये… ऐकूनच भुवया उंचावल्या; कोणत्या राज्यातला हा आकडा?
Most Expensive City : भारतातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई, दिल्ली, हैदराबाद बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. अशाचत आता यातील एका शहरातील घरभाडे हे एक लाखाच्या वर पोहोचले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारतात महागाई वाढलेली आहे, याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. भारतातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई, दिल्ली, हैदराबाद बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. या शहरांमधील महागाई गगनाला भिडलेली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये भाड्याने मिळणाऱ्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. टेक कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत माहिती दिली आहे. बंगळुरूत एका 3 बीएचके घराचे भाडे 1 लाखावर पोहोचले असल्याचे त्याने म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
साहिल खान हे एका स्टार्टअप कंपनीत काम करतात. त्यांनी सोशल मीडियावर बंगळुरूमध्ये घर शोधताना आलेला अनुभव शेअर केला आहे. साहिल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, कुक टाउनमधील एक घरमालक 3BHK साठी 100,000 रुपये भाडे मागत आहे. लोक वेडे झाले आहेत का? साहिल यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले की, ‘तुम्ही मुंबईत या; तुम्हाला येथे एक लाख रुपयांमध्ये 2BHK घर भाड्याने मिळू शकते.
नेटकऱ्यांनी दिला सल्ला
साहिल यांनी एकाच दिवशी आठ घरांना भेट दिली आणि म्हटले की, यावरून मला समजले की, या शहरातील घरांचे भाडे नियंत्रणाबाहेर जात आहे. एका नेटकऱ्याने त्याच्या पोस्टवर कमेंट करताना म्हटले की, ‘ते तुम्हाला स्वतःचे घर खरेदी करण्यास प्रोत्साहित करत आहेत.’ आणखी एकाने लिहिले की, “दिल्ली-एनसीआरच्या तुलनेत बेंगळुरूमध्ये भाडे महाग होत आहेत.’ अभिषेक नावाच्या एका व्यक्तीने म्हटले की, ‘मी बेंगळुरूमध्ये एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला 1 बीएचकेसाठी कोटेशन मागितले. त्याने मला 36 लाखांचा आकडा सांगितला.
Landlords are asking for 1L rent in Cooke Town for a 3bhk. Have people lost their minds?
— Sahil Khan (@sahilk) November 18, 2025
साहिल बंगळुरूला स्थलांतर करण्याच्या तयारीत
समोर आलेल्या माहितीनुसार साहिल लग्न करण्याचा विचार करत आहे आणि तो जानेवारीमध्ये बंगळुरूला स्थलांतर करू इच्छित आहे. तो सध्या कोरमंगला येथे राहतो, तो तिथे 2 बीएचकेसाठी 50 हजार रुपये भाडे देतो. बंगळुरूतील कुक टाउनमध्ये त्याला 3 बीएचकेसाठी 80 ते 90 हजार भाडे सांगण्यात आले आले आहे. यावर साहिल खान म्हणाले की, या शहरात आयटी कर्मचारी आहेत म्हणून पैसे जास्त मागत आहेत. बंगळुरूमधील फ्लोअर स्पेस इंडेक्स वाढत नाही तोपर्यंत शहरातील घरांच्या किमती कमी होणार नाहीत.
