यंदा पण रडवणार कांदा, या 6 राज्यात असा वधारला भाव

Onion Rate | दिल्लीसह दक्षिणेतील पुद्दुचेरीमध्ये कांद्याचे भाव 70 रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशातील 6 राज्ये अशी आहेत, जिथे कांद्याचे भाव 60 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे यंदा कांदा रडवणार का? अशी भीती आहे. केंद्र सरकारने किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय योजना केली आहे. त्यांनी हस्तक्षेप केला आहे.

यंदा पण रडवणार कांदा, या 6 राज्यात असा वधारला भाव
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 4:22 PM

नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत कांद्याने सध्या खळबळ उडून दिली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यात तर दक्षिणेतील काही राज्यात काद्यांने 70 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील 6 राज्यांमध्ये कांद्याची किंमत 60 रुपयांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकार अलर्टवर आहे. कांदाने यापूर्वी पण देशात रोष वाढला होता. कांद्याने यापूर्वी अनेक राज्य सरकारांना हादरे पण दिले होते. केंद्र सरकारने किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी आता तातडीने उपाय योजना केली आहे. कमी उत्पादन आणि वेळेवर पुरवठा न झाल्याने काद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.

बफर स्टॉक बाजारात

कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉक बाजारात आणला आहे. पण त्याचा थेट परिणाम दिसला नाही. अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या किंमती 70 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहेत. किरकोळ बाजारात हा भाव 80 रुपये किलोवर पोहचल्याचे चित्र आहे. तर काही राज्यात हा भाव 60 रुपयांच्या घरात पोहचला आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील या 8 राज्यांमध्ये कांद्याचा भाव सर्वाधिक

  1. राजधानी दिल्लीत कांद्याचा दर 78 रुपये किलोवर पोहचला आहे. राजधानीत कांद्याची किरकोळ विक्री जास्त दराने होत असल्याची ओरड आहे.
  2. गुजरातमध्ये प्रतिनुसार, काद्यांच्या किंमती कमी जास्त आहेत. कांद्याचा भाव 75 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहचतो.
  3. दक्षिण भारतात पुद्दुचेरीमध्ये कांद्याचा भाव 70 रुपयांवर पोहचला आहे.
  4. गोवेकरांना पण जादा दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. कांद्याचा भाव 67.5 रुपये आहे.
  5. तामिळनाडूमध्ये कांदा महागला आहे. काद्यांची किंमत 65.86 रुपये प्रति किलो आहे.
  6. स्वर्गीय भूमी केरळमध्ये पण कांद्याचे दर वधारले आहेत. या राज्यात कांद्याचा भाव 65.57 रुपये आहे.
  7. ईशान्येतील मेघालयात पण किंमती अधिक आहे. येथील काद्यांचा दर 64.6 रुपये आहे.
  8. दादरा नगर हवेलीतही कांद्याचे भाव जास्त आहे. कांद्याचा भाव 63 रुपयांवर पोहोचला आहे.
  9. अंदमान निकोबारमध्ये कांद्याचा दर 60 रुपयांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात पण कांदा 60 रुपयांच्या घरात पोहचला आहे.

कशामुळे ही दरवाढ?

खराब हवामानामुळे खरीप काद्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पेरणी उशीरा झाल्याने कांदा पिकाला फटका बसला. खरीप पीक लवकर हाती येणार नसल्याने बाजारात तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे चित्र आहे. काद्यांचा साठा कमी होत आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.