AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वेने कोविड मार्गदर्शक तत्त्वे 6 महिन्यांसाठी वाढवली, तर 500 रुपये दंड लागणार

जेव्हा देशात 22,431 लोक कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, तेव्हा ही घोषणा समोर आली. यासह देशातील कोरोना व्हायरस संक्रमणाची एकूण संख्या वाढून 3,38,94,312 झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले की, सक्रिय प्रकरणे 2,44,198 वर आलीत, जी 204 दिवसांतील सर्वात कमी आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वेने कोविड मार्गदर्शक तत्त्वे 6 महिन्यांसाठी वाढवली, तर 500 रुपये दंड लागणार
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 07, 2021 | 5:15 PM
Share

नवी दिल्लीः रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी कोविड 19 (COVID-19) शी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सहा महिन्यांसाठी किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली. अधिसूचनेत म्हटले आहे की, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. भारतीय रेल्वेने सांगितले, प्रवाशांना विनंती केली जाते की प्रवास सुरू होण्यापूर्वी विविध राज्यांनी जारी केलेल्या आरोग्य सल्लागार मार्गदर्शक सूचना वाचा.

सक्रिय प्रकरणे 2,44,198 वर आलीत, जी 204 दिवसांतील सर्वात कमी

जेव्हा देशात 22,431 लोक कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, तेव्हा ही घोषणा समोर आली. यासह देशातील कोरोना व्हायरस संक्रमणाची एकूण संख्या वाढून 3,38,94,312 झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले की, सक्रिय प्रकरणे 2,44,198 वर आलीत, जी 204 दिवसांतील सर्वात कमी आहे. सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, 318 जणांच्या मृत्यूंसह मृतांची संख्या 4,49,856 झाली. सलग 13 दिवसांपासून नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये दररोज वाढ 30,000 च्या खालीय.

आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली. सणांच्या वेळी त्यांच्या घरी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत रेल्वेला कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा चुकवायचा नाही, जेणेकरून कोरोनाची प्रकरणे वाढतील आणि लोक अडचणीत येतील. 17 एप्रिल 2021 पासून रेल्वेकडून 500 रुपयांचा दंड लागू करण्यात आला, जो 6 महिन्यांसाठी होता. याला आणखी 6 महिन्यांनी 16 एप्रिल 2022 पर्यंत वाढविण्यात आली. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत.

उत्सवाच्या विशेष गाड्यांच्या 2 जोड्या वाढल्या

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने उत्सवाच्या विशेष गाड्यांच्या 2 जोड्यांचा कालावधी वाढवला. ट्रेन क्रमांक 06053/06054, मदुराई-बिकानेर-मदुराई साप्ताहिक महोत्सव मदुराईहून 11.11.21 ते 27.01.22 (12 ट्रिप) (प्रत्येक गुरुवारी) आणि 14.11.21 ते 30.01 पर्यंत बिकानेरहून विशेष ट्रेन सेवा 22 पर्यंत वाढवण्यात आली.

संबंधित बातम्या

टाटा समूहाच्या ‘या’ दोन शेअर्समध्ये बंपर उसळी, गुंतवणूकदार काही मिनिटांत मालामाल

पार्लरमधून आइस्क्रीम खरेदी करणे महागणार, 18% जीएसटी लागणार

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ