AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pay GST | उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंसाठी मोजा जीएसटी, प्री पॅक, लेबल खाद्यदार्थांसाठी 5 टक्के जीएसटी, दही, ताकाची गोडी होणार कमी

GST on Packed labelled Food : उद्यापासून तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंसाठी अधिक दर मोजावे लागणार आहे. सरकारने यापूर्वी कर कक्षेत नसलेले अनेक अन्नधान्य आणि खाद्यान्नावर जीएसटी लागू केला आहे.

Pay GST | उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंसाठी मोजा जीएसटी, प्री पॅक, लेबल खाद्यदार्थांसाठी 5 टक्के जीएसटी, दही, ताकाची गोडी होणार कमी
जीएसटीची खिश्याला झळImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 17, 2022 | 5:31 PM
Share

GST Rate 18 July 2022 News : सर्वसामान्य गेल्या काही दिवसांपासून महागाईने (Inflation) होरपळत असताना आता सरकारच्या आणखी एक निर्णय (Government Decision) या आगीत तेल ओतणार आहे. सोमवारपासून 18 जुलै 2022 पासून घरगुती वापराच्या अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी (GST On Essential Goods) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचा खिशा आणखी खाली होणार आहे. जीएसटीचे नवे दर उद्यापासून लागू होत आहे. त्यामुळे काही पॅकबंद (Packed) अन्नधान्य आणि खाद्यान्नाच्या किंमती वाढणार आहेत. दैनंदिन वापरातील या वस्तू महाग झाल्याने त्याचा आर्थिक बोजा थेट ग्राहकांवर पडणार आहे. सराकरच्या या निर्णयाला देशभरातील व्यापाऱ्यांनी एक दिवसीय लक्षणीय बंद (Traders one day Strike) पाळून विरोध दर्शविला खरा. पण त्याचा सरकारवर सध्या तरी काहीच परिणाम झाला नसल्याचे समोर येत आहे. तोपर्यंत ग्राहकांना पॅकड, सीलबंद, लेबल लावलेल्या अनेक रोजच्या वापरातील वस्तूंसाठी जादा दाम (GST Rate News) मोजावे लागतील.

या वस्तूसाठी मोजावे लागतील ज्यादा दाम

गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या (GST Council) बैठकीत ही जीएसटी लावण्याची शिफारस करण्यात आली होती. सरकारच्या मंजुरीनंतर टेट्रा पॅकमधील दही, लस्सी आणि ताकावर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीलबंद दही, लस्सी आणि ताक, तयार पीठ जीएसटी परीघात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्लेड, कागद, कात्री, पेन्सिल, शार्पनर, चमचे, काटा चमचा, केक सर्व्हर्स. नकाशे आणि चार्ट, ऍटलेस यावरील जीएसटीत सरकारनं वाढ केली आहे. या निर्णयामुळे या वस्तूंवर 12 टक्क्यांऐवजी आता 18 टक्के जीएसटी अदा करावा लागणार आहे. एवढेच नाही तर या निर्णयामुळे एलईडी लाईट्स आणि लॅम्पचे दर ही वाढण्याची शक्यता आहे.याशिवाय प्रत्येक दिवसासाठी 1,000 रुपये आकार घेणा-या हॉटेल्स, 5,000 रुपये भाडे असणाऱ्या रुग्णालयातील खोल्यांवर ही जीएसटीची गाज पडणार आहे. त्यामुळे दैनंदिन वस्तूच नाही तर सर्वच क्षेत्रावर या निर्णयाचा व्यापक परिणाम दिसून येईल. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमी यासारख्या काही सेवांवरही सध्याच्या 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कर आकारला जाईल.

जीएसटी लागू होण्याची प्रक्रिया

लोकसभेत 29 मार्च 2017 रोजी जीएसटी कर प्रणाली मंजूर करण्यात आली. 1 जुलै 2017 रोजी देशासाठी ही कर व्यवस्था स्वीकारण्यात आली. या नवीन प्रणालीने वॅट, एक्साईज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स सारखे 17 टॅक्स संपवले. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने वार्षिक 40 लाख रुपये उलाढाल असणा-या उद्योगांना या करांच्या परिघातून दूर ठेवले. तर 1.5 कोटी उलाढाल असणा-या उद्योगांना 1 टक्का टॅक जमा करण्याची सूट देण्यात आली. वेळोवेळी जीएसटीत बदल करण्यात आले.

महसूली मोर्चावर आघाडी

महसूली मोर्चावर जीएसटीने केंद्र सरकारची गंगाजळी ओतप्रोत भरली आहे. मे महिन्यात जीएसटीने सरकारच्या गंगाजळीत 1.41 लाख कोटींची धनराशी जमा केली. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील महसुलाचा विचार करता हा आकडा 44 टक्के अधिक आहे. यापूर्वी एप्रिल 2022 जीएसटी संकलनाचा रिकॉर्ड झाला. 1.68 लाख कोटी रुपये महसूल जमा झाला. हा जीएसटीच्या इतिहासातील सर्वाधिक महसूल मानण्यात येतो. जीएसटी लागू झाल्यापासून मे 2022 हा असा चौथा महिना ठरला, ज्यात जीएसटी एक लाख कोटी रुपयांहून अधिक जमा झाला.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.