Paytm, PhonePe-Mobikwik आणि Amazon Pay युजर्ससाठी मोठी बातमी, 24 तासात तीन महत्त्वपूर्ण निर्णय

Paytm, PhonePe-Mobikwik आणि Amazon Pay या युजर्ससाठी महत्त्वपूर्ण आहेत. (Paytm PhonePe-Mobikwik RBI New Rule)

Paytm, PhonePe-Mobikwik आणि Amazon Pay युजर्ससाठी मोठी बातमी, 24 तासात तीन महत्त्वपूर्ण निर्णय
पेटीएम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 12:00 PM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI- Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी क्रेडीट पॉलिसीनंतर अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील काही घोषणा या डिजीटल पेमंट वॉलेट म्हणजेच Paytm, PhonePe-Mobikwik आणि Amazon Pay या युजर्ससाठी महत्त्वपूर्ण आहेत. (Paytm, PhonePe-Mobikwik operators RBI hiked the limit of outstanding balance in wallets)

युजर्स लवकरच कोणत्याही अडचणीशिवाय एका डिजीटल वॉलेटमधून दुसऱ्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करु शकता. यात सर्व्हिस प्रोव्हायडरशी तुमचे कोणतेही लेनदेन राहणार नाही. तसेच तुम्हाला UPI च्या माध्यमातून तुम्हाला बँक अकाऊंटसोबत लिंक असलेल्या वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर करु शकता. हे वॉलेट-टू-बँक, बँक-टू-वॉलेट किंवा बँक-टू-बँक ट्रान्सफर करु शकता. याबाबत आरबीआयचा इंटरऑपरेबिलिटी प्रस्ताव लागू झाल्यानंतर युजर्सला वेगवेगळ्या वॉलेटमध्ये पैस ट्रान्सफर करता येणार आहे. म्हणजेच उदा. पेटीएम युजर्स फोन पे वॉलेटच्या युजर्सला पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत.

RBI ने बदलले पैसे ट्रान्सफरचे नियम

डिजीटल वॉलेट्ससारख्या पीपीआय इन्स्ट्रूमेंटमध्ये स्टोअर मूल्यानुसार वस्तू आणि सेवा खरेदीची सुविधा मिळते. आरबीआयच्या वेबसाईटनुसार पीपीआय इन्स्ट्रूमेंट तीन प्रकारची असतात. यात क्लोज सिस्टम पीपीआय, सेमी क्लोज सिस्टम पीपीआय आणि ओपन सिस्टम पीपीआयचा समावेश आहे. देशात Paytm, Mobikwik, PayU इत्यादी यांसारखे सेमी क्लोज वॉलेट येतात. तर पैसे काढण्याची सुविधा ही फक्त ओपन सिस्टम पीपीआयला आहे. यात डेबिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्डचा समावेश होतो.

युजर्सला लवकरच पेटीएम, मोबिकविक यासारख्या डिजीटल वॉलेट आणि नॉन-बैंक एंटिटीजच्या प्रीपेड कार्डातून पैसे काढता येणार आहे. यामुळे बँक-नसलेल्या संस्थांकडून रोख रक्कम काढता येणार आहे. यासाठी ग्राहकाने केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. सध्या बँकांकडून देण्यात आलेल्या केवायसी पीपीआय (क्रेडिट / डेबिट कार्ड) वर रोख पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. पीपीआय प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटशी असतो. फॉरेक्स कार्ड्स, डिजिटल वॉलेट्स इत्यादी पीपीआयची काही उदाहरणे आहेत.

आरटीजीएस आणि एनईएफटी सुविधाही मिळणार 

बँकांव्यतिरिक्त अन्य वित्तीय संस्था RTGS आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सुविधा पुरवणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही घोषणा केली आहे. डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, फिन्टेक आणि पेमेंट बँकेसारख्या नॉन-बँका द्रुतगतीने आरटीजीएस आणि एनईएफटी सुविधा देण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त बँकांमध्ये उपलब्ध होती. (Paytm, PhonePe-Mobikwik operators RBI hiked the limit of outstanding balance in wallets)

संबंधित बातम्या : 

स्वामित्व योजना गावांना आत्मनिर्भर करण्यासाठी महत्वाचं पाऊल: नरेंद्र सिंह तोमर

Fixed Deposite schemes: फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे टाकताय, मग सावध राहा; अन्यथा आयकर विभागाची कारवाई

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.