चॉकलेटपेक्षा स्वस्त पेट्रोल! 1 रुपयात मिळवा 1 लिटर, 50 रुपयांत तर टाकी फुल्ल
Cheapest Petrol in the World: जगातील या देशात पेट्रोल अगदी कवडीमोल भावाने मिळते. एक लिटर पेट्रोलचा भाव भारतात 100 रुपयांच्या आतबाहेर आहे. तर या देशात एक लिटर पेट्रोल अवघ्या 1 रुपयांना मिळते. तुमच्या बाईकची टाकी अवघ्या 50 रुपयांत फुल्ल होते.

Get 1 Liter for 1 Rupee : सध्या जागतिक स्तरावर एक मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली. त्यांना काल न्यूयॉर्क येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली. पण व्हेनेझुएलाची ओळख ही इंधनाचा सर्वात समृद्ध देश अशी आहे. दक्षिण अमेरिकेतली या देशात खनिज तेलाचे मोठे साठे आहेत. त्यावर ताबा मिळवण्यासाठीच ही लष्करी कारवाई करण्यात आली आहे. तर या देशात पेट्रोल अगदी कवडीमोल मिळते. भारतात एक लिटर पेट्रोलसाठी 100 रुपयांच्या आतबाहेर मोजावे लागतात. पण व्हेनेझुएलात एक लिटर पेट्रोल अवघ्या 1 रुपयांना मिळते. तर बाईकची टाकी अवघ्या 50 रुपयांमध्ये फुल्ल होते.
अवघ्या 50 रुपयांमध्ये टाकी फुल्ल
व्हेनेझुएलमध्ये एका चॉकलेटच्या किंमतीत एक लिटर पेट्रोल मिळते. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल या देशात मिळते. व्हेनेझुएलात एक लिटर पेट्रोलची किंमत 0.01 ते 0.035 डॉलरदरम्यान आहे. जर भारतीय चलनात पाहिले तर ही किंमत अवघी 1 ते 3 रुपये प्रति लिटर इतकी आहे. भारतात पेट्रोलची टाकी फुल्ल करायला हजार रुपये कमी पडतात. तिथे व्हेनेझुएलात 35 ते 50 लिटर क्षमतेची इंधन टाकी केवळ 50 ते 150 रुपयांत फुल्ल होते.
व्हेनेझुएलात दोन इंधन प्रणाली
व्हेनेझुएलात पेट्रोल विक्रीची व्यवस्था थोडी वेगळी आहे. त्याला दुहेरी इंधन प्रणाली म्हणतात. या पद्धतीनुसार, देशात दोन पद्धतीने पेट्रोल विक्री होते. पहिली पद्धत ही सबसिडीचे पेट्रोल, जे सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. तर दुसरे प्रीमियम पेट्रोल आहे. या पेट्रोलची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हिशोबानुसार निश्चित होते. यावर सरकार सबसिडी देत नाही. वृत्तानुसार, प्रिमियम पेट्रोल भारतातील दरापेक्षा अत्यंत स्वस्त आहे. व्हेनेझुएलात प्रीमियम पेट्रोलची किंमत जवळपास 42 रुपये प्रति लिटर इतकी आहे. जर एखादी व्यक्ती या प्रीमियम पेट्रोलचा पर्याय निवडते. तेव्हा त्याला 50 लिटरची टाकी फुल्ल करण्यासाटी जवळपास 20 ते 25 डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास 1700 ते 2100 रुपये मोजावे लागतात.
व्हेनेझुएलानंतर सौदी अरबचा क्रमांक
अल जजीरा या आंतरराष्ट्रीय वृतवाहिनीनुसार, व्हेनेझुएला हा इंधन क्षेत्रातील बादशाह आहे. 2023 पर्यंत व्हेनेझुएलाकडे 303 अब्ज बॅरल तेलाचा साठा होता. तर व्हेनेझुएला पर्याय म्हणून सौदी अरबकडे पाहिल्या जाते.267.2 अब्ज बॅरलसह सौदी अरब दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकाव इराणचा नंबर लागतो. या देशाकडे 208.6 दशलक्ष डॉलर तेलाचे भांडार आहे. कॅनडा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या देशाकडे 163.6 अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे.
